Jalgaon Lok Sabha Election : उमेदवारी बदलाच्या चर्चेमुळे जिल्ह्यात संभ्रम कायम

Jalgaon : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. केवळ अंतर्गत वादामुळे उमेदवार बदलाची चर्चा असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
Bharatiya Janata Party
Bharatiya Janata Partyesakal

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. केवळ अंतर्गत वादामुळे उमेदवार बदलाची चर्चा असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा ‘जळगाव’चा शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होताच त्यांची जल्लोषात मिरवणूक काढली आणि प्रचाराला सुरवातही झाली, तर ‘रावेर’चा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदावार अद्याप घोषित होण्याच्या प्रतिक्षेत आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

जळगाव व रावेर मतदारसंघ महायुतीत भारतीय जनता पक्षाकडे आहेत. पक्षातर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघात माजी आमदार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच पक्षातर्गंत नाराजी उघडपणे बाहेर आली.

रक्षा खडसे यांच्याशी पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी वाद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाले. पक्षाचे रावेर विभागाचे जिल्हाप्रमुख अमोल जावळे यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात आले. अशातच त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे उमेदवारीची चर्चाही सुरू झाली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात थेट पक्षातच बंड झाले. पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पारोळा येथील भाजपचे युवा पदाधिकारी करण पवार यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना ठाकरे गटातर्फे थेट उमेदवारी जाहीर झाली. (jalgaon political news)

Bharatiya Janata Party
Jalgaon Airport : जळगावातून विमान उड्डाणासाठी 18 एप्रिलचा मुहूर्त; गोवा, हैद्राबादसाठी ‘टेक ऑफ’

आता भाजपचे इच्छुक उमेदवार व माजी खासदार ए. टी. पाटील यांनी पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपली जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. या भेटीने पुन्हा एकदा उमेदवारी बदलाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

विरोधक जळगावात जोशात

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे, तर रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे. जळगावातून ठाकरे गटाने करण पवार या भारतीय जनता पक्षाचा युवा नेता फोडून त्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एक चांगला तुल्यबळ उमेदवार दिल्याची चर्चा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात विरोधी शरदचंद्र पवार गटातर्फे उमेदवार जाहीर होण्याची अद्याप प्रतिक्षा आहे. या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Bharatiya Janata Party
Jalgaon News : अखेर नशिराबाद उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com