Jalgaon Lok Sabha Election : मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दोन मेपर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील ३ मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले.
Central level officials present in the review meeting.
Central level officials present in the review meeting.esakal

चोपडा : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दोन मेपर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील ३, लाख २२ हजार २२८ मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून ३१९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे.

चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मुदतीत मतदार चिठ्ठी वाटप पूर्ण करण्याचे सुचित केले. या वेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे आदी हजर होते.

या वेळी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व साहित्याचे वाटप साहित्य नोडल अधिकारी रवींद्र माळी यांनी केले. तसेच सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांना शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. (Latest Marathi News)

Central level officials present in the review meeting.
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 14, रावेर मतदारसंघात 24 उमेदवार; माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट

घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप करताना घरातील सज्ञान व्यक्तीच्या हाती मतदार चिठ्ठी देण्यात यावी, तसेच कोणत्याही स्वरूपाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार चिठ्ठी दिल्याबाबत नोंदवहीवर सही घ्यावी. तसेच शिल्लक मतदार चिठ्ठी दोन मेनंतर अनुपस्थित, स्थलांतरित व मृत मतदारांच्या याद्यांसह तहसील कार्यालयात जमा करण्यात यावे.

यापूर्वी मतदार चिठ्ठीवर मतदाराचे फोटो होते. मात्र यावेळेस त्या ठिकाणी बारकोड देण्यात आलेले आहे. हा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी मतदाराचा संपूर्ण तपशील दिसणार आहे. तसेच मतदारसंघाच्या पाठीमागील बाजूवर मतदान केंद्राचा मार्ग देखील दर्शविण्यात आलेला आहे.

Central level officials present in the review meeting.
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com