video ; चाळीस मिनिटात गॅसकटरने एटीएम कापून साडेचौदा लाखावर डाका ;१४ लाख ४१ हजार लंपास 

चाळीस मिनिटात गॅसकटरने एटीएम कापून साडेचौदा लाखावर डाका ;१४ लाख ४१ हजार लंपास 
चाळीस मिनिटात गॅसकटरने एटीएम कापून साडेचौदा लाखावर डाका ;१४ लाख ४१ हजार लंपास 

जळगाव, :- शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळील स्टेट बँक शाखेचे बाहेरील एटीएम तीन चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार रुपयांची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. १ः३३लाख तीन दरेाडेखोर आत शिरले २ः३३ ला काम फत्ते करून पसार झाले.विशेष म्हणजे शहरात लॉकडाऊनचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात असताना एटिएमवर दरोडा पडला आहे. तोंडाला रुमाल बांधलेले तीन दरेाडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तिघे भामटे हरीपुरा उत्तरप्रदेशातील असल्याचा पोलिसांचा कयास असून संशयिताच्या शोधार्थ पथके तैनात करण्यात आली आहे. 

जळगाव शहरात शिवकॉलनी बसस्टॉप समोरच स्टेटबँकेची गणेश कॉलनी शाखा आहे. बँकेच्या प्रवेशद्वारावरच एटीएम असून मध्यरात्रीनंतर १ः५५ मिनिटांनी तीन दरोडेखोर या एटीएम मध्ये दाखल झाले. एटिएमचे शटर बाहेरून लावून एक बाहेरच अधांरात दडून बसला तर, उर्वरित दोघांनी सोबत आणलेल्या गॅसकटरने एटीएम मशीन आणि त्यानंतर शेजारील सीडीएम(कॅश डीपॉझीट मशीन) एकामागून एक फोडले. सोबत आणलेल्या अडीच तीन किलोच्या छोट्या गॅस हंडीद्वारे यंत्राच्या कॅश डीपॉझीट बॉक्सची लोखंडी चादर चोरट्यांनी कापून काढली. एटीएम यंत्रातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड काढल्यानंतर त्या शेजारील सीडीएम मशीनही कापून काढले, मात्र त्यातील कॅश नेण्यापूर्वी तिघ भामट्यांनी २ः३५ वाजता पेाबारा केला. दिवस उजाडल्यावर घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक निरीक्षक डॉ.नीलाभ रोहन, निरीक्षक बापू रेाहोम, निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पेालिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ब्रांच मॅनेजर दिवेश अर्जुन चौधरी यांच्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ करीत आहेत.  

चाळीस मिनिटात साडे चौदालाख 
स्टेटबँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या वेळा नुसार १ः५५ मिनीटानी लाल टिशर्ट घातलेला एक भामटा एटीएम केबीन मध्ये शिरतो..लगेच दुसरा बाहेरुनशटर बंद करतो...अर्धवट बंद शटर मधुन तिसरा आणि मुख्य संशयित गॅसकटर आणि छोटे एलपीजी सिलिंडर घेऊन आत येतेा. एटीएम यंत्राच्या कॅश बॉक्सच्या शेजारून गॅस कटरने लोखंडी चादर कापून कॅश बॉक्स उघडला जातो. आतील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रेाकड त्यातून मिळते. लगेच शेजारील सीडीएम मशीन त्याच गॅस कटरने कापले जाते मात्र, त्यातील रोकड चोरट्यांना काढता आली नाही परिणामी सात लाख सुरक्षित राहिले. 


माचिस-लायटर पुरावे 
३३ मिनिटांत चोरट्यांनी एटीएम यंत्र कापून त्यातील  रोकड काढून नेली जाताना चोरट्यांनी घटनास्थळावर कुठलेच पुरावे सोडले नसून त्यांच्या हाताचे ठसेही मिळणे दुरापास्त आहेत. मात्र, गॅस कटर पेटवण्यासाठी चोरट्यांनी वापरलेली माचीस आणि सिगरेट लायटर पेालिसांना घटनास्थळी मिळून आले आहे. माचीस गुरुग्राम (हरीयाणा) येथील असून एटीएम फेाडणारी परप्रांतीय मोठी टोळीच महाराष्ट्रात दाखल झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पोलीस गाडी आली पण..
शहरात ७ ते १३ जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन लागू आहे. महामार्गावरील वाहने वगळता शहरात वाहतुकही बंद असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. रात्री पावणे दोन वाजता जिल्‍हापेठ पोलीस ठाण्याची पेालिसगाडी या एटीएम बाहेरून गेली. मात्र, दार बंद असल्याने त्यांना एटीएम बंद असावे असे वाटले म्हणून ते निघून गेले. शहरातही ठिक-ठिाणी पोलीस तैनात होते,विशेष म्हणजे रामानंद आणि जिल्‍हापेठ पेालिसांची महामार्गावर सामायीक गस्त असतांना अशा परिस्थीतीत शिवकॉलनीत राष्ट्रीय महामार्गावरील स्टेटबँक एटीएम निवांतपणे फोडून चोरट्यांनी चारचाकी वाहनात पलायन केले. एटीएम फोडण्यापूर्वी दोनतीन दिवस या एटीएमची पहाणी त्यांनी करून ठेवल्याचा अंदाज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com