अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा चोवीस तासात अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा चोवीस तासात अटक

भिकाऱ्यांची टीप..बलात्काऱ्याच्या हाती बेड्या


जळगाव,ता. ः- गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर भर दिवसा काल दहावर्षीय बालिकेवर अत्याचाराची  झाल्याची घटना घडली होती. पिडीतेच्या जबाबावरून शहर पेालीसात  गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन गुन्हेशाखेच्या पथकाने स्केच आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  संशयिताचा शोध घेऊन गोलाणी मार्केट मधील भिकाऱ्याच्या टिप(माहितीवरुन) संशयिताला चोवीस तासांत  सौरव वासुदेव खिर्डीकर(वय-२६) याला अटक केली आहे. अटकेतील संशयिताने गुन्हा कबूल केला असून अचूक पद्धतीने पंचासमक्ष घटनास्थळ दाखवले आहे. 

शहरात लॉकडऊन सुरू असल्याने सर्वच व्यापारी संकुले निर्मनुष्य झाली आहेत. ओस पडलेल्या गेालाणी व्यापारी संकुलात दुपारी साडेबाराच्या सुमारास दहावर्षीय बालिकेला घेऊन जात सौरव खिर्डीकर याने अत्याचार केला हेाता. जखमी पिडिता शिवसेना महिला पदाधिकारी मंगला बारी यांना दिसल्यावर त्यांनी तिची आस्थेवाईक चौकशी केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते. पीडिताचा जबाब होऊन गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तपासाची जबाबदारी गुन्हेशाखेला सोपवली होती. निरीक्षक बापु रोहोम, यांच्या पथकातील विजयसींग पाटील, अनिल इंगळे, रामकृष्ण पाटील, अशरफ शेख, संतोष मायकल यांच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. गोलाणी व्यापारी संकुलासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केल्यानंतर त्याचा सलग अभ्यास करून चौकशी अंती आज दुपारी एक वाजता संशयित सौरव खिर्डीकर यास अटक करण्यात आली. 

भिकाऱ्यांशी संवाद
गुन्हेशाखेसाठी स्केच काढणारे कलावंत योगेश सुतार यांनी सिसीटीव्हीचे अवलोकन करून काढलेल्या स्केच घेऊन तपास पथकाने कामाला सुरुवात केली. रेल्वेस्थानक परिसर पुर्णबंद असून तेथील भिकारी, निराधार लोकांनी जवळपासच्या परिसरात आश्रय घेतला आहे. त्यापैकीच पिडिता असून गोलाणी मार्केटच्या चारही बाजूला आश्रयाला असलेल्या लहान मुलांना स्केच दाखवल्यानंतर त्यांनी या मुलाची ओळख पटवली.

टिळा लावणाऱ्याची चौकशी
पिडीत मुलीला खोलीत नेणाऱ्या तरुणाला दोन लहानग्यांनी बघितले असल्याने त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून एका मेडिकलवर कामाला असलेल्या तरुणाची पेालिसांनी चौकशी केली. हा तरुण हुबेहूब स्केच सारखा चेहरा असलेला आणि शरीबांधाही तसा असल्याने पेालिसांनी त्याची चौकशी केली मात्र, खरा संशयित सौरव खर्डीकर तो पर्यंत निर्धास्त हेाता. ताब्यात घेतलेल्या तरुणा सारखाच दिसणाऱ्याचा शोध सुरू केल्यावर दुपारी १ वाजता त्याला इंद्रप्रस्थनगर येथून राहत्या घरातून पेालिसांनी ताब्यात घेतला. देाघा लहानग्यांनी त्याला ओळखले. नंतर पथकाने त्याची चौकशी केल्यावर त्याने त्रोटक माहिती दिली. विश्‍वासात घेतल्यावर त्याने कबुली दिली आणि घटनास्थळही तपास पथकाला दाखवले.  

पुरावे संकलित
घटनास्थळावरून फॉरेन्सीक पथकाने पुरावे संकलित केले असून तपासात त्याचा वापर होणार आहे. चोवीस तासांत पेालिसांनी गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पेालिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी आपल्या पथकाचे कौतुक करून त्यांना रिवार्ड जाहीर केले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com