जळगाव : विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघांना अटक

विवाहानंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडत असत.
suicide
suicideesakal

पाचोरा : येथील पुनगाव रोड भागातील गणपतीनगरात प्रिया सुरवाडे (वय २६) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह दोघांविरुद्ध माहेरच्यांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

suicide
नैराश्‍यातील विवाहिता आत्महत्येपासून परावृत्त

मध्य प्रदेशातील माहेर असलेल्या प्रियाचा विवाह गेल्या वर्षी पाचोरा येथील विनोद सुरवाडे यांच्याशी झाला होता. परंतु विवाहानंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडत असत. सतत भांडण होत असल्याचे प्रियाने वेळोवेळी माहेरच्यांना कळवले होते. दोघांमध्ये रविवारी (ता. ७) भांडण झाल्याने प्रियाने आपल्या बहिणीला कळवले होते. तिने तिच्या भावास कळवल्यानंतर प्रियाचा भाऊ व मेव्हणे हे रक्षाबंधनाचे निमित्त करून व प्रियाच्या सासरच्यांची समजूत घालण्यासाठी निघाले व सोमवारी (ता. ८) पहाटे ते पाचोरा येथे आले असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

suicide
माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...

बहीण आत्महत्या करूच शकत नाही. तिचा घातपात झाला आहे, असा संशय प्रियाच्या माहेरच्यांनी व्यक्त करून तिचे वडील रमेश शहादेव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्या आधारे पोलिसांनी मृत प्रियाचा पती विनोद सुरवाडे व भोजराज खैरे (चाळीसगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया वसावे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com