Jalgaon News : कासोदा येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Jalgaon News : कासोदा येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक घेण्यात आली.
Amol Patil, Vice President of District Bank while expressing his opinion in Mahayuti meeting.
Amol Patil, Vice President of District Bank while expressing his opinion in Mahayuti meeting.esakal

कासोदा : कासोदा येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्याबाबत महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे प्रचारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. (Jalgaon Meeting of office bearers of Mahayuti at Kasoda)

लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने मला संधी दिली असल्याचे सांगितले. या वेळी लोकसभा मतदारसंघ प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, कासोद्याचे माजी सरपंच महेश पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय चौधरी यांनी आभार मानले. बैठकीस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस नीलेश परदेशी, माजी तालुकाध्यक्ष भिका कोळी, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी. (latest marathi news)

Amol Patil, Vice President of District Bank while expressing his opinion in Mahayuti meeting.
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

सरपंच पुरुषोत्तम चौधरी, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण बाविस्कर, मनसेचे संदीप

चौधरी, जितेंद्र तांदळे, छोटू क्षीरसागर, भूषण पाटील, नरेश ठाकरे, माजी सरपंच बबिता पाटील, रत्नाबाई चौधरी, सरला पाटील, प्रतिभा बाविस्कर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Amol Patil, Vice President of District Bank while expressing his opinion in Mahayuti meeting.
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com