Jalgaon News : नुकसानग्रस्तांसाठी 106 कोटी मंजूर : मंत्री अनिल पाटील

Jalgaon : आपत्तीमुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपयांच्या निधी वितरित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.
 Anil Patil
Anil Patilesakal

Jalgaon News : महाराष्ट्रात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांसह इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपयांच्या निधी वितरित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

याबाबतचा शासन निर्णय निघाला असून या निर्णयामुळे बाधितांना जलद मदत मिळेल, असा विश्वासही मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला.(106 crore sanctioned for loss of crops and other properties due to calamity)

राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व मालमत्ता नुकसानीची मदत मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व बाधित शेतकरी तसेच नागरिकांकडून मागणी होत होती. तीन- चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून निधी वाटपाला अखेर मान्यता देण्यात आली.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना दिलासा मिळणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. बाधितांना मदत करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वेळोवेळी निधी वितरित करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नव्हती.

 Anil Patil
Jalgaon municipality News : महापालिकेच्या ट्री बँकेत रोपे जमा करण्यास नागरिकांचा प्रतिसाद

त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनाला पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त प्रस्तावानुसार निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानंतरही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत निधी मंजुरीला मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

 Anil Patil
Jalgaon Municipality News : सारं काही खोटं.. पार्किंग सुविधा, रॅम्प सर्वच नकली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com