Jalgaon municipality News : महापालिकेच्या ट्री बँकेत रोपे जमा करण्यास नागरिकांचा प्रतिसाद

Jalgaon municipality : वाढदिवस किंवा आपल्या घरातील्याच्या स्मरणार्थ महापालिकेच्या ट्री बँकेत रोपे जमा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
occasion of birthday. Umakant while handing over seedlings to municipal commissioner  Vidya Gaikwad
occasion of birthday. Umakant while handing over seedlings to municipal commissioner Vidya Gaikwadesakal

Jalgaon municipality News : वाढदिवस किंवा आपल्या घरातील्याच्या स्मरणार्थ महापालिकेच्या ट्री बँकेत रोपे जमा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला नागरिकांतर्फे चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेचे अधिकारी उमाकांत नष्टे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महापालिका ट्री बँकेत रोपे आयुक्तांकडे सूपूर्द केली आहेत.

नागरिकांना आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या घरातल्याच्या स्मरणार्थ झाडे लावण्याची इच्छा असते परंतु त्यांची ती इच्छा पूर्ण होत नाही. (Jalgaon Response of citizens to deposit saplings)

अशा व्यक्तीनी महापालिकेच्या ट्री बँकेतून रोपे नेवून ती लावून जगवावी तसेच नागरिकांनी ट्री बँकेत रोपे जमा करावीत, असा अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

याच संकल्पनेला प्रतिसाद देत महापालिकेतील अधिकारी नष्टे यांच्या परिवाराने उमाकांत नष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा शोभिवंत झाडे महापालिकेच्या ट्री बँकेत दिली आहेत.

occasion of birthday. Umakant while handing over seedlings to municipal commissioner  Vidya Gaikwad
Jalgaon News : 300 चौरस फुटांपर्यंत मिळकतींना घरपट्टी माफीचा ठराव मंजूर करा : जयश्री महाजन

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे ती सूपूर्द करण्यात आली आहेत. नष्टे यांच्या इच्छेनुसार महापालिका आयुक्तांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी उद्यानात ही झाडे लावण्यात आली.

शहरातील नागरिकांनी या संकल्पनेत सहभाग घेऊन जळगाव शहर सुंदर व हिरवेगार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन अभियंता प्रकाश पाटील यांनी केले आहे.

occasion of birthday. Umakant while handing over seedlings to municipal commissioner  Vidya Gaikwad
Jalgaon Municipality News : सारं काही खोटं.. पार्किंग सुविधा, रॅम्प सर्वच नकली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com