Jalgaon News : ''लग्नात हुंडा दिला नाही, आता माहेरुन पैसे आण'', पैशांसाठी पती पत्नीला छळतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

husband-beats-his-wife

Jalgaon News : ''लग्नात हुंडा दिला नाही, आता माहेरुन पैसे आण'', पैशांसाठी पती पत्नीला छळतोय

जळगाव : लग्नात हुंडा दिला नाही, तसेच माहेरून एक लाख रुपये आणावेत, म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: कोरोनात उरकले साधे विवाह! आता मानपान, हुंड्यासाठी संसारात वाढला कलह; घटस्फोटाचे २००० अर्ज

विटनेर (ता. जळगाव) येथील योगिता परदेशी यांचा बाणगाव (ता. चाळीसगाव) येथील विनोद लक्ष्मण परदेशी यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नात मानपान व हुंडा दिला नाही, म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेला फारकत देण्याची धमकी देत माहेरुन एक लाख रुपये आणावेत, यासाठी शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.

हेही वाचा: Viral Video : भर मंडपात नवरदेवाने पकडला मेहुणीचा हात; मग झाला...

त्यांनी मंगळवारी (ता. ३) दिलेल्या फिर्यादीवरून पती विनोद परदेशी, सासू मथुराबाई परदेशी, नणंद अरुणाबाई सुरेश परदेशी (रा. पळासखेडा, ता. सोयगाव), भाचा शुभम सुरेश परदेशी, सागर परदेशी, नणंद रत्नाबाई भरत परदेशी, भाचा यश भरत परदेशी (रा. वाकडी, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.