HSC Exam 2024 : इंग्रजीच्या पेपरला एकही कॉपी सापडली नाही; पथकातील 9 अधिकारी खाली हात परतले

HSC Exam 2024 : बारावीची परिक्षा सुरू झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला शिक्षण विभागाची नउ पथके कार्यरत होती.
Jalgaon Officer inspecting student at 12th examination center.
Jalgaon Officer inspecting student at 12th examination center. esakal

Jalgaon News : बारावीची परिक्षा सुरू झाली. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला शिक्षण विभागाची नउ पथके कार्यरत होती. प्रत्येक पथकात सहा अधिकारी, प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती, गट शिक्षणााधिकांऱ्याचे एक-एक पथक, पोलिस, होमगार्ड यांचा बंदोबस्त एवढा मोठा फौजफाटा असताना एकाही ठिकाणी कॉपी करताना कोणी विद्यार्थी आढळून आला नाही. हे विशेष होय.

आतापर्यंत इंग्रजीचा पेपरला सर्रास कॉप्यांचा महापूर असल्याचे चित्र पहावयास मिळायचे. यंदा मात्र कॉपी मुक्त अभियान राबविल्याने विद्यार्थ्यांना कॉप्या करता आल्या नसल्याचे चित्र होते.पहिल्या इंग्रजीच्या पेपरला ४७ हजार २७२ विद्यार्थी हजर होते.

८२५ विद्यार्थी गैरहजर होते. एकूण ४८ हजार ९७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. काही ठिकाणी वर्गातच कॉप्या चालल्याचे सांगण्यात आले. यंदा बारावीसाठी जिल्हात ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत. कॉपी मुक्त परीक्षेसाठी नउ भरारी पथकांसह पोलिस, होमगार्ड, तहसीलदार, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकांची नियुक्त केली आहे.

Jalgaon Officer inspecting student at 12th examination center.
Jalgaon Municipality News : शीतल कलेक्शन इमारतीच्या पार्किंगचा तिढा

बारावीच्या परिक्षेसाठी २७ हजार ७६८ मुले तर २० हजार ५०५ मुली असे एकूण ४८ हजार २७३ परीक्षार्थी होते. या परिक्षेसाठी ७८ परिक्षा केंद्र होती. आज बारावीची परीक्षा शांततेत पार पडली एकही कॉपी केस झाली नाही भरारी पथकांनी नियोजनाप्रमाणे परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

बारावीचा उद्या (ता.२२) हिंदीचा पेपर आहे. २३ ला मराठी, २४ ला मराठी प्राकृत/संस्कृत, २६ ला वाणिज्य संघटन, २७ ला भौतिकशास्त्र, २८ ला गृह व्यवस्थापण, २९ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, २ मार्चला गणित, ४ ला बालविकास, कृषी विज्ञान, ५ ला सहकार, ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर आहे.

Jalgaon Officer inspecting student at 12th examination center.
HSC Exam 2024 : बारावीच्या परीक्षेला सुरवात; पोलिस अधीक्षक धिवरे यांची विविध केंद्रांना भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com