Jalgaon Accident News : मोटरसायकल अपघातात चहार्डी येथील एकाचा मृत्यू

Jalgaon : महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील धर्मेंद्र विजय महाजन (वय ५६) यांना डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Late Dharmendra Mahajan
Late Dharmendra Mahajanesakal

Jalgaon Accident News : चोपडा- गोरगावले रस्त्यावरील खडगाव गावाबाहेर भरधाव वेगाने चोपड्याकडे येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील धर्मेंद्र विजय महाजन (वय ५६) यांना डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Late Dharmendra Mahajan
Jalgaon News : जिल्ह्यात 37 हरितगृह, शेडनेट, 3 मधुमक्षिका पालन प्रकल्प ‘कागदा’वर

चहार्डी (ता.चोपडा) येथील रहिवासी व गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी धर्मेंद्र विजय महाजन (ह.मु. हरेश्वर कॉलनी, चोपडा) हे त्याच्या बजाज कंपनीच्या दुचाकीने (क्रमांक : एम. एच. १९ डिके ७२३५) गोरगावले येथे ड्यूटीवर जात होते.

खडगाव गावाजवळ महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनाची (क्रमांक : एम. एच. १९ सीवाय ४८९८) त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामुळे धर्मेंद्र महाजन यांच्या डोक्याच्या जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जितेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे हे तपास करीत आहेत. मयत महाजन हे ‘सकाळ’चे बातमीदार जितेंद्र महाजन यांचे ज्येष्ठ बंधू होत.

Late Dharmendra Mahajan
Jalgaon Accident News : ट्रॅकची दुचाकीला धडक; 2 जण जागीच ठार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com