
Jalgaon News : महसूल अधिकारी, कर्मचारी झाले कलावंत; सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळविली दाद
जळगाव : ‘कजरा मुहब्बत वाला’, ‘खैके पान बनारस वाला’, ‘काला काला चष्मा’, ‘ओम शांती ओम’, अशा ऐकापेक्षा समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, काव्यरचना, मिमिक्रीद्वारे महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते जिल्हा प्रशासनातर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी झालेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे.
हेही वाचा: Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. ला. ना. शाळेच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Tribal Culture Sculpture : मूर्तीमधून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा काकडांचा मानस!
महसूल, अधिकाऱ्यांनी आपल्यातील कलावंत, खेळाडूंचे गुण दर्शविले. अनेकांनी आपल्यातील कला सादर करताना स्वत:ला झोकून दिल्याने उपस्थित नागरिकांना जागेवर खिळवून ठेवले. काहींनी समूह नृत्य सादर केले, तर काहींनी वैयक्तिक नृत्य सादर केले.
उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, प्रांताधिकारी महेश सुधळकर, चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे, तहसीलदार महेंद्र माळी यांनी ‘काला काला चष्मा’ या गाण्यावर धमाल नृत्य केली. ‘एक पल का जीना’, ‘ओम शांती ओम’ या गीतांना धमाल केली. ‘माय भवानी’ या गाण्यावर समृह नृत्य कांचन वाणी व इतरांनी सादर केले.
हेही वाचा: Jalgaon News | ‘अमृत’चे कनेक्शन दिलेल्या तारखेत पूर्ण करा : जिल्हाधिकाऱ्यांची मक्तेदारांना तंबी
‘होठोसे छू लो तुम’ हे गीत राहुल सोनवणे व ‘आप के आने से’ हे गीत संजय ब्राह्मणे यांनी म्हटले. रोहिदास मोरे यांनी काव्य वाचन केले. ‘चोरीचा मामला’, ‘छबीदार छबी’, ‘तुझा रंग लागला’, ‘कांची रे कांची रे’, ‘सोचेंग तुम्हे प्यार करे’, ‘कजरा मुहब्बत वाला’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘खैके पान बनारस वाला’आदी गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. सुनील ठाकरे यांनी मिमिक्री सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. कैलास चावडे, सूचिता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.