Jalgaon Accident News : जळगाव-पाचोरा बस झाडावर आदळली; चालकाचे नियंत्रण सुटले

accident
accidentesakal

Jalgaon News : शिरसोली (ता. जळगाव) जवळील पेट्रोलपंपानजीक बुधवारी (ता. ३) दुपारी साडेचारच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस झाडावर धडकली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. बसमधील प्रवासी जखमी झाले. (Jalgaon Pachora bus hits tree jalgaon accident news)

जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पब्लिक मारच्या भितीने अपघातानंतर चालक बस सोडून पसार झाला.

यात रिना श्रीराम मोहन (वय १५, रा. पाचोरा), नूरबानो जमील बागवान (४४), नम्रा जमील बागवान (२०, रा. पाचोरा) आणि ओंकार तुकाराम पाटील (६५, जाम्हणे, ता. पाचोरा) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद झालेली नव्हती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

accident
Chhattisgarh Accident: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 ठार; नशीब बलवत्तर म्हणून वाचली चिमुकली

प्रवाशांच्या जिवाशी खेळ

जिल्‍ह्यात पाचारेा-जळगाव, जळगाव-भुसावळ, जळगाव-यावल, रावेर, जळगाव-धरणगाव-अमळनेर या मार्गांवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. याकडे जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलिस किंवा महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

accident
Nandurbar Accident News : नवापाडा येथील दोघांचा अपघातात मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com