Jalgaon Crime News : रावेरला जुगार अड्ड्यावर छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalgaon Crime : आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकाने येथील जुगार अड्यावर छापा टाकून १७ हजार रोख रुपयांसह सुमारे पाच लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकाने येथील जुगार अड्यावर छापा टाकून १७ हजार रोख रुपयांसह सुमारे पाच लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चौदा जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी तथा आयपीएस अन्नपूर्णा सिंग यांना रावेर-रसलपूर रस्त्यावरील एका घरामध्ये झन्ना मन्ना जुगार खेळणाच्या पत्ता क्लब सुरू असल्याची माहिती मिळाली. (Raver raids gambling dens Assets worth five and a half lakhs seized)

त्या नुसार आयपीएस श्रीमती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील व पोलिस कर्मचारी अनिल इंगळे, सुमीत बाविस्कर यांना छापा टाकण्यासाठी पाठवले. या वेळी रावेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यात आला.

या वेळी काही जुगारी झन्ना मन्ना पत्ता खेळत होते. पोलिसांची जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या वेळी घटनास्थळावरून १६ दुचाकी, ८ विविध कंपनीचे मोबाईल व १७ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले व पत्ता खेळणारे जुगारी मुस्तफा तडवी (रमजीपूर), गणेश पवार (अभोडा तांडा), जुबेर रफीक शेख (इमामवाडा रावेर), फिरोज तडवी,(जिन्सी आभोडा)

Crime
Crime News: ३.४४ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन बंधूंना अटक!

सलीम तडवी (अभोडा), आदिलखान सलीमखान (इमामवाडा रावेर), समाधान महाजन (रसलपूर), किसन पवार (अभोडा), सतीष शिरतुरे (सिद्धार्थनगर, रावेर), अल्ताफ रशीदखान (भोईवाडा रावेर), सुधाकर महाजन, (जुना सावदारोड रावेर), रमझान तडवी (रसलपूर), शुभम महाजन (बक्षीपूर), दिलीप न्हावी आदी चौदा जण रंगेहात मिळून आले.

या बाबत हवालदार गणेश मनुरे यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करीत आहेत.

Crime
Nagpur Crime: पैशांचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय आरोपीला २० वर्षांची शिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com