Fraud
Fraudsakal

Crime News: ३.४४ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन बंधूंना अटक!

Mumbai Crime: अमित आणि विकी हे दोघेही साई इस्टेट कन्सल्‍टंट चेंबूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक, तर ललित हा त्यांचा काका आहे | Both Amit and Vicky are directors in Sai Estate Consultants Chembur Private Limited Company, while Lalit is their uncle.

Andheri Cirme: शहरातील एका नामांकित कंपनीची तीन कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित भगवान वाधवानी, विकी भगवान वाधवानी या दोन बंधूंना मालवणी पोलिसांनी अटक केली. त्‍यांना बोरिवलीतील स्‍थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fraud
Nashik Crime : आणखी एका संशयिताला अटक! ठमके खूनप्रकरणात चौघांचा सहभाग निष्पन्न

घाटकोपरला राहणारे भरत मावोजी शहा हे खाजगी कंपनीत कामाला आहेत.

बीकेसी येथे या कंपनीचे कार्यालय आहे. रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित ही कंपनी २००८ साली संचालक अमर सोलंकी, उज्ज्वल राणे यांनी सुरू केली होती. २०१९ साली कंपनीच्या संचालकांची अमित, विकी आणि ललित टेकचंदानी यांच्याशी ओळख झाली होती.

यातील अमित आणि विकी हे दोघेही साई इस्टेट कन्सल्‍टंट चेंबूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक, तर ललित हा त्यांचा काका आहे.

Fraud
Nagpur Crime: पैशांचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मार्च २०२१ मध्ये या तिघांनी त्यांच्याकडे व्यवसाय वाढीसाठी दोन कोटींची मागणी केली होती. त्यांच्या कंपनीने तीन वर्षांसाठी २४ टक्के व्याजदराने दोन कोटी रुपयांचे कर्ज दिले.

तीन वर्षांनंतर कंपनीला मुद्दल दोन कोटी आणि व्याजापोटी ४८ लाख रुपये येणे अपेक्षित होते. वारंवार मागणी करूनही तिघांनी पैसे परत केले नाहीत.

कंपनीच्या वतीने भरत शहा यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.

Fraud
Nagpur Crime: पैशांचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय आरोपीला २० वर्षांची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com