Jalgaon Municipality News : मनपाला 10 वर्षांपर्यंतच भाडेकराराचा अधिकार

Jalgaon Municipality : महापालिकेच्या व्यापारी संकुलासह स्थावर मालमत्तेचे भाडेकरार, हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेला दहा वर्षांपर्यंतचे अधिकार देण्यात आले आहेत.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या व्यापारी संकुलासह स्थावर मालमत्तेचे भाडेकरार, हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेला दहा वर्षांपर्यंतचे अधिकार देण्यात आले आहेत. दहा वर्षांहून अधिकच्या भाडेकरार किंवा भाडेकराराचे नूतनीकरणासाठी महापालिकेला शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी (ता. १५) शासनाने जारी केला. महापालिकेच्या मालमत्तांचे भाडेकरार, हस्तांतरण आणि भाडेकराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ ला शासन निर्णय काढला होता. (Jalgaon Right of tenancy to municipality for up to 10 years)

त्यात दहा वर्षांपर्यंतचे भाडेकरार करणे, हस्तांतरण करणे किंवा भाडेकराराचे नूतनीकरण करण्याविषयी महापालिकांना अधिसूचित करण्यात आले होते. महापालिका आणि भाडेपट्ट्याचा कालावधी दहा वर्षांपर्यंचा असेल, असे नमूद केले होते. परंतु या नियमावलीतील भाडेपट्ट्याच्या कालावधीसंदर्भात महापालिकेच्या स्तरावर काही समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते.

यामध्ये मुख्यत: भाडेकराराचा कालावधी कमी असल्याने मालमत्तांना भाडेकरारासाठी मागणी कमी असणे व भाडेकराराची रक्कम कमी प्राप्त होणे. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Smita Wagh : भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची एरंडोलला भेट; पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

अशा समस्या येत असल्यामुळे या नियमावलीला मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आली आहे. या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिका व भाडेकरारधारक यांनी सामंजस्याने भाडेकरार अथवा नूतनीकरणाचा कालावधी निश्चित करावा, महापालिका त्यांच्या स्तरावर दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी मालमत्ता भाडेकराराने देऊ शकते.

मात्र, ज्यांची भाडेकराराची मागणी दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आहे, अशी मालमत्ता भाडेकराराने देण्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Anganwadi Sevika : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : आमदार चिमणराव पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com