Jalgaon Crime News : सरपंच पतीला हवेत 1 लाख; 16 लाखांच्या कामात हवी 2 लाखांची लाच

ग्रामपंचायतींतर्गत १६ लाखांच्या रस्त्याचे काम झाले असून, त्या कामाच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराने ठरलेली रक्कम देऊनही त्याच्याकडे अतिरिक्त एक लाख रुपये मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : फुलपाट (ता. धरणगाव) ग्रामपंचायतींतर्गत १६ लाखांच्या रस्त्याचे काम झाले असून, त्या कामाच्या बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराने ठरलेली रक्कम देऊनही त्याच्याकडे अतिरिक्त एक लाख रुपये मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित कंत्राटदार आणि सपरंच पती यांच्यात झालेल्या संभाषणाची टेप विविध सामाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल करण्याची आता मागणी होऊ लागली आहे. (Jalgaon serious case where sarpanch husband asked contractor for an additional one lakh rupees)

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रहिवास असलेला धरणगाव तालुक्यात फुलपाट गाव आहे. फुलपाट ग्रामपंचायतींतर्गत १६ लाखांच्या रस्ते काँक्रिटीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. काम पूर्ण झाले असून, या कामात ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराने अगोदरच १० टक्के बिल मंजुरीसह स्वाक्षरी करणाऱ्यांना कबुल करून दिले आहेत.

असे असताना अतिरिक्त रक्कम मिळावी, म्हणून कंत्राटदाराला संबंधिताकडून त्रास दिला जात असून, कंत्राटदाराकडे १ लाख रुपयांची लाच (खंडणी) मागितली जात असल्याचे व त्याला कंत्राटदार विरोध करीत असल्याच्या संभाषणाची क्लीप गेल्या दोन दिवसांपासून विविध समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल झाली आहे.

Crime
Crime News: 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचा कर्मचाऱ्याकडुन लैंगिक छळाचा प्रयत्न; वाघोलीतील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

संबंधितांवर कारवाईची मागणी

कंत्राटदारास १ लाख रुपयांची (एक पेटी) ची मागणी करणारा व्यक्ती सरपंचाच पती असून, आप्पा (ग्रामसेवक)चे नाव पुढे करून ते स्वाक्षरीला नाही, असे म्हणत आहे. असे सांगून शेवटी बघा. मग तुम्ही, अशी धमकीही देत आहे. घडला प्रकार पालकमंत्र्यांच्या गावाजवळचाच असून.

अशा पद्धतीने कंत्राटदारांना खंडणी मागणारे लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने स्वयंस्फूर्तीने दखल घेत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच जिल्‍हा प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

"आमचा त्या ऑडिओ क्लीपशी संबंध नाही. मुकुंदभाऊंच्या माध्यमातून आमचे कॉन्ट्रॅक्टर वाणी साहेबांशी बोलणे झाले आहे. ते प्रकरण मिटले आहे." - दत्तू पाटील, सरपंच पती

Crime
Solapur Crime : व्ही. के. मार्ट मॉलची ३१ लाखांची फसवणूक ; बार्शीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com