Crime News: 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचा कर्मचाऱ्याकडुन लैंगिक छळाचा प्रयत्न; वाघोलीतील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

Crime News: एका कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या विद्यार्थ्याचा लैगिंक छळाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime News
Crime NewsEsakal

वाघोली: वाघोलीतील एका नामांकित शाळेत एका कर्मचाऱ्याने १० वर्षाच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात विद्यार्थ्याच्या आईने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली असून कर्मचाऱ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत फिर्यादी यांचा १० वर्षीय मुलगा शिक्षण घेत आहे. १९ एप्रिलला फिर्यादी यांनी त्याला शाळेमध्ये सोडल्यानंतर कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारून तू "मुव्ही बघतो की नाही. मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल..असे सांगितले. त्याला त्या विद्यार्थ्याने नकार दिला. यावर त्या कर्मचाऱ्याने इथले सगळे कॅमेरे बंद आहेत. तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही असे सांगितले आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला.

या कृतीला घाबरून तो विद्यार्थी तेथून पळून गेला. यानंतर तो कर्मचारी पुन्हा वर्गात आला. तुला इथेच फिल्म दाखवतो असे बोलून त्यांने मोबाईलमध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने सदर प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने फिर्याद दिल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत तपास सुरू असल्याचे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी सांगितले.

Crime News
Nashik Extortion Crime News : निवडणुकीचा प्रचार करायचा तर पैसे द्या! दोघा सराईतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

या प्रकाराबाबत त्या विद्यार्थ्याच्या आईने पोलीसात तक्रार केली आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करीत आहे. तो कर्मचारी केअर टेकर आहे. परंतु असा कोणताही प्रकार स्कूल मध्ये झालेला नाही, अशी प्रतिक्रिया संबंधित शाळेतील मुख्याध्यापिकांनी दिली आहे.

Crime News
Malegaon Bomblast: बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंग यांना २५ एप्रिलला हजर राहण्याचे निर्देश

वाघोलीतील विविध शाळेत मागील सहा महिन्यात घडलेल्या धक्कादायक घटना

* स्कूलचे शुल्क भरले नसल्याच्या कारणावरून मुलांना शाळेत डांबवून ठेवल्याचा प्रकार.

* स्कूल व्हॅन मध्ये मुले असताना व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न.

* परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना न दिल्याने एका पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल कार्यालयात तोडफोड.

* स्कूलचा लेखापाल विद्यार्थ्यांचे शुल्कचे पैसे घेवून पळून गेलेला असताना स्कूल कडून पालकांकडे पुन्हा शुल्कची मागणी. यामुळे पालकांचे स्कुल मध्ये ठिय्या आंदोलन.

Crime News
Nashik Fraud Crime News: कटारिया, पारख यांच्या बंगल्यावर छापा! उपनगर पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यात घरझडती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com