Jalgaon Sharad Pawar Daura : दिग्गज नेत्यांचा अमळनेर दौरा ठरणार भाकरी फिरवणारा?

 Sharad Pawar News
Sharad Pawar NewsEsakal

Jalgaon Sharad Pawar Daura : आगामी लोकसभा व त्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या अमळनेरात पक्षाचे विठोबा अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार तब्बल १४ वर्षांनंतर दाखल होणे, ही बाब अनेकांसाठी अभिमानास्पद व सर्वांसाठी भुवया उंचवणारी ठरली आहे. (Jalgaon Sharad Pawar visit political analysis news )

त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती ‘दुधात साखर’ पडण्यासारखी होती. पक्षातील विविध मान्यवराच्या ‘मांदियाळी’ने वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. मात्र, दिग्गज नेत्यांचा अमळनेर दौरा पक्षाला बळकटी व ‘भाकरी फिरवणारा’ ठरणार आहे, एवढे मात्र निश्चित!

राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक रिताताई बाविस्कर यांच्या प्रयत्नांनी शरद पवार राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराच्या उद्‌घाटननिमित्ताने दाखल झाले होते. त्यांच्या साथीला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सर्व टीम होती.

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापासून निघालेला "रोड शो" लक्षवेधी ठरला. दरम्यान दिग्गज नेते हे कोणाच्या निवासस्थानी जातात, कोणाच्या घरी नाश्ता तसेच भोजनाचा आस्वाद घेतात याची उत्सुकता अनेकांनी लागली होती. कोण कोणाला भेटतो यावरूनही चर्चेला उधाण आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Sharad Pawar News
Sharad Pawar : नवीन पक्ष आला की पवारांना भीती - चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवार यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर श्री. पवार थेट भोजनासाठी उमेश पाटील यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी तब्बल एक ते दीड तासापर्यंत भोजनासह विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्यासमवेत अजित पवार व जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती. वयाची ८० पार केलेला हा नेता कार्यकर्ता शिबिरावेळी सामान्य कार्यकर्त्यांची विचारपूस व काळजी घेताना दिसला.

साक्षात पक्षाचा विठोबा हा प्रतिपंढरपूरात दाखल झाल्याने दर्शनाचा व सहवासाचा लाभ पक्षाच्या नेत्यांसह सामान्य कार्यकर्त्यांना झाला. श्री पवार यांनी नेत्यांना योग्य वेळी दिलेल्या सूचना या अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत. आगामी निवडणुकीत ‘प्लॅन बी’ तयार करण्यावर ही या नेत्याचा भर दिसून आला.

शरद पवार यांच्या सूचनेवरून अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, अन विशेष म्हणजे जाताना वाहनात वेदांशू पाटील या युवा कार्यकर्ताला सोबत घेतले. त्याला काही टीप्स पण दिल्यात. (राजकीय नव्हे) एक दिवस अगोदरच त्यांनी एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते.

 Sharad Pawar News
Sharad Pawar News : शरद पवार अमळनेरला म्हशी खरेदीसाठी आले..!

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले. अजित पवारांनी ग्रंथालय शिबिराच्या समन्वयक रिता बाविस्कर यांच्या निवासस्थानी जाऊन जणू काही पक्षासाठी ‘महिला सशक्तीकरण’ला बळकटी दिली. मंगळग्रह मंदिरात शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केल्यानंतर माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या विनंतीवरून ढेकू रस्त्यावरील ‘क्रांती पर्व स्मारक’ जागेची पाहणी करून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी आठला येथील स्थानिक ‘भाजप’च्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अचानक झालेल्या या भेटीने चर्चेला उत आला होता, त्यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा, यासाठी त्यांची भेट घेतली होती, असे तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षात महिलांना आदराचे स्थान आहे, हे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीवरून दिसून आले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी बाजार समितीच्या सभापती निवडीपासून अलिप्तवादी धोरण स्वीकारले होते. दिग्गज नेते आल्यावर ते सक्रिय झाले असले, तरी स्थानिक नेत्यांवर मात्र नाराजी दिसून आली. ही बाब आगामी निवडणुकीसाठी फायद्यासाठी आहे, की तोट्याची हे आगामी काळात दिसून येणार आहे.

 Sharad Pawar News
Ashadhi Ekadashi 2023 : पंढरपूर वारीसाठी 135 जादा बस; सर्व आगारांमधून या तारखेपासून सुटणार बस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com