Jalgaon News : ‘एसआयटी’चा अहवाल सदोष असल्याचा ठपका; खडसेंवरील दंडाच्या कारवाईस स्थगिती

Jalgaon : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी बजावण्यात आलेल्या १३७ कोटींच्या दंडाच्या नोटिशीला महसूल विभागाने स्थगिती दिली आहे.
Former Minister Eknath Khadse
Former Minister Eknath Khadseesakal

Jalgaon News : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी बजावण्यात आलेल्या १३७ कोटींच्या दंडाच्या नोटिशीला महसूल विभागाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात विशेष चौकशी पथकाचा अहवाल सदोष असल्याचा ठपका महसूल विभागाने ठेवला आहे.

महसूल विभागाच्या या आदेशामुळे खडसेंना दिलासा मिळाला आहे. (Jalgaon SIT report on Eknath Khadse was found to be flawed and penal action was stayed)

आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत खडसे कुटुंबीयांनी सातोद शिवारात १ लाख १८ हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महामार्गासाठी बेकायदेशीरपणे गौणखनिज उत्खनन करण्यात येऊन तब्बल ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याची व शासनाची फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप होता.

विभागीय आयुक्तांनी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. ‘एसआयटी’ने चौकशी करत शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर महसूल विभागाने एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या रोहिणी खडसे आणि स्नुषा खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना १३७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. (latest marathi news)

Former Minister Eknath Khadse
Jalgaon News : उन्हाळ्याची चाहूल.. वातावरणात बदल; सकाळी, रात्री थंडी, अन दिवसा ऊन

खडसेंनी शासनाकडेही एकतर्फी कारवाईबाबत अपील केले होते. ‘महसूल विभागाचे कक्ष अधिकारी सदानंद मोहिते यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कारवाई स्थगितीबाबत कळविले आहे. विशेष तपास पथकाचा अहवाल व त्यातील निष्कर्ष पाहता पथकाने संबंधितांना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार त्यांची बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही, त्यामुळे पथकाचा अहवाल प्रथमदर्शनी सदोष वाटतो, असे या पत्रात म्हटले आहे.

"या प्रकरणी बजावलेली दंडाची नोटीस व कारवाईही आमची बाजू ऐकून न घेता एकतर्फी करण्यात आल्याचे मी सुरवातीपासूनच सांगत होतो. आता शासनानेच ही कारवाई एकतर्फी ठरवत विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरविला आहे, त्यातच सर्व काही आले."- एकनाथ खडसे, माजी मंत्री.

Former Minister Eknath Khadse
Jalgaon Educational News : आता इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची ‘ढकलपास’ बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com