Jalgaon Unseasonal Rain Damage : अवकाळीने मका, गहू, केळीचे 3 हजार हेक्टरवर नुकसान

Jalgaon News : अवकाळी पाऊस व वादळामुळे केळी, मका, उशिराने पेरलेल्या गव्हासह आदी पिकांचे सुमारे तीन हजार ४११ हेक्टवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
Unseasonal Rain Damage (file photo)
Unseasonal Rain Damage (file photo)esakal

Jalgaon News : जिल्ह्यातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यात मंगळवारी (ता. ९) झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे केळी, मका, उशिराने पेरलेल्या गव्हासह आदी पिकांचे सुमारे तीन हजार ४११ हेक्टवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली आहे. आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Jalgaon Unseasonal Rain Damage to maize wheat banana on 3 thousand hectares)

राज्यात हवेची द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यात आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. या बदललेल्या स्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेलनेस वेदरचे नीलेश गोरे यांनी दिली.

३८४० शेतकरी बाधित

बुधवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता असली तरी उन्हाचा चटका जाणवत नव्हता. आजचे तापमान ३८ ते ३९ अंशांदरम्यान होते. जामनेर, बोदवड, मुक्ताईनगरला मंगळवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेली केळी, मका, गहू, ज्वारी, मका, केळी, आंबा, भाजीपाला, लिंबू, तिळ या पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण १२३ गावे बाधित झाले असून, सहा हजार ५०६ शेतकरी बाधित झाले आहेत. (latest marathi news)

Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon News : एरंडोल येथील शिबिरात 135 कर्मचाऱ्यांची ‘दांडी’

बाधित शेतकरी व नुकसान

तालुका--गावे--शेतकरी--नुकसान (हेक्टर)

जामनेर--५३--१६७८--१२९६

बोदवड--३२--९८८--८०६

मुक्ताईनगर--३८--३८४०--१३०९

एकूण--१२३--६५०६--३४११

"पिके कापणीवर आली असतील, तर ती कापून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. अजून दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे." -के. एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ए.टीं’च्या गाठीभेटी; वाघांची धाकधूक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com