Jalgaon Vegetable Rates Hike : भाज्या किलोमागे 20 ते 25 रुपयांनी महागल्या! आठवड्यापासून बाजारात आवक घटली

Jalgaon News : गेल्या आठवड्यापासून बाजारात प्रत्येक भाजीच्या भावात साधारणतः किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.
Vegetable seller
Vegetable selleresakal

Jalgaon Vegetable Rates Hike : जून महिना सुरू झाला. तरीही तापमानाचा उच्चांक कायम आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावून गेला. तरी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांच्या दरांत तेजी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून बाजारात प्रत्येक भाजीच्या भावात साधारणतः किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या भावांमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. (Jalgaon Vegetables cost Rs 20 to 25 per kg rates hike)

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध जिल्ह्यांतील भाजीपाला विक्रीस येतो. उन्हाळ्यात बाहेरील आवक वाढते. कारण स्थानिक भागातून मालाची आवक नाहीच्या बरोबर असते. सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी, भावात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे रोज अर्धा किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक आता एक पाव किलो भाजी खरेदी करताना दिसत आहे. भाज्यांचे भाव वाढल्याने घराघरांत आहारात डाळींचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.

लसूण, कोथिंबीर प्रचंड महागले

एरवी पाच ते दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता कमीतकमी २० रुपयांना घ्यावी लागत आहे. सध्या कोथिंबिरीचा तुटवडा जाणवत आहे. लसणाचे दर गेल्या महिन्यापर्यंत २०० रुपये किलो होते. ते गेल्याआठवड्यापासून पुन्हा वाढले असून, २४० रुपयांवर गेले आहेत. पाऊस पडल्यावर लसणाच्या दरात आणखी वाढ होऊन लसूण ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याचा अंदाज भाजी विक्रेत्यांनी वर्तविला आहे.

सध्या सर्वांत स्वस्त म्हणजे कांदा व बटाटाच आहे. नवीन उन्हाळी कांदा बाजारात येत असून, ३० रुपये किलोने विक्री होणारा कांदा आता २५ रुपयांना विकत आहे, तर बटाट्याचे भाव ३० रुपयेच आहेत. मुला-मुलींना बटाट्याची भाजी खूप आवडते. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, अनेकदा डब्यामध्ये बटाट्याची भाजी दिली जाते. यामुळे सध्या बटाटा आवर्जून खरेदी केला जात आहे. (latest marathi news)

Vegetable seller
Adhar Update: साडेचार लाख मुलांचे आधार अपडेट बाकी! बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये होतात बदल; मोठ्यांचे आधार 10 वर्षांनंतर करा अपडेट

पुढील दोन महिने दरात तेजीची शक्यता

उन्हाळा आणि पावसाळा ऋतू बदलादरम्यान दरवर्षी भाज्यांच्या किमती साधारणतः इतर ऋतूंच्या तुलनेत दुप्पटीने वाढलेल्या असतात. सध्या भाज्यांमध्ये किरकोळ दरवाढ आहे. पावसाळी भाजीपाला आल्यानंतर भाज्यांच्या किमतीमध्ये पुढे दिलासा मिळणार आहे. तोपर्यंत भाज्यांच्या किमती वाढतच राहणार असल्याचे स्थानिक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

भाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

पालक : ७५ ते ८०

टोमॅटो : ८०

फुलकोबी व पत्ताकोबी : ८०

वांगी : १००

बटाटे : ३० ते ४०

भेंडी : ८० ते १००

मेथी : ८० ते १००

गिलके : ६० ते ८०

खिरे : ७० ते ८०

मिरची : ९० ते १००

गंगाफळ : ६० ते ७०

Vegetable seller
Jalgaon Agriculture News: मृगाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा! खरिपाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com