Satpura Jungle : सातपुड्याच्या जंगलात प्राण्यांसाठी आता ठिकठिकाणी पाणवठे

Satpura Jungle : पशु, पक्ष्यांना पिण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना वनक्षेत्रपालांना दिल्या आहेत.
Watershed in the interior of Satpura.
Watershed in the interior of Satpura.esakal

Jalgaon News : जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. सातपुड्याच्या जंगलातील रावेर वनक्षेत्रातील वनखंड क्रमांक २०, १९, २५ २६, २७, २४, ५८ सह संपूर्ण जंगलातील प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, या म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी यावल वन विभागचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख सरसावले आहेत. पशु, पक्ष्यांना पिण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना वनक्षेत्रपालांना दिल्या आहेत. (Jalgaon waterholes for animals in Satpura forest)

त्यामुळे जंगलातील प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी सुटणार आहे. जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. पक्षी व प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होण्याबरोबरच जीव कासावीस होण्याची भीती अधिक आहे. जंगलातील लहान- मोठे ओहोळ, डबकी, नाले नद्यांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने मार्च अखेरील जंगलातील प्राणी, पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते.

नैसर्गिक पाण्याचे झरे, डबके, पाणवठे साधारणत: एप्रिल व मे महिन्यामध्ये आटल्यानंतर पशुपक्षी, प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख यांनी पुढाकार घेतला आहे. जंगलातील प्राणी, पक्षांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी नियोजन केले आहे.

यावल वन विभागामार्फत बांधण्यात आलेले वनबंधारे, वनतळे, पाणवठ्यांमध्ये मे अखेरपर्यंत अल्प प्रमाणात पाणी असते. पाण्याअभावी मृत्यू होण्याऱ्या पशु - पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी जंगलातील ज्या जागांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी पाणवठे निर्माण करुन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Watershed in the interior of Satpura.
Jalgaon Wheat Production : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक

प्राणीप्रेमींना आवाहन

स्वयंसेवी संस्था, सुजाण नागरिक, प्राणी प्रेमींनी याबाबत पुढाकार घेऊन नैसर्गिक पाणवठांचा आधार घेऊन तेथे पाण्याचा साठा साठविण्यासाठी उपाययोजना केल्यास, पशु-पक्षी-प्राणी यांचा जीव वाचू शकेल, त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी केले आहे.

"उन्हामुळे पाणवठ्यांमधील पाणी कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी लोकवस्तीत येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे जंगलातच पाणवठ्यांद्वारे प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी टँकर व अन्य माध्यमातून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना वनक्षेत्रपाल यांना दिल्या आहेत. तसेच काही संस्थांनादेखील आवाहन केले आहे."- जमीर एम. शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगांव

Watershed in the interior of Satpura.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : पश्चिम भाग लाल दिव्यापासून वंचितच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com