Jalgaon Wheat Production : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक

Jalgaon Wheat Production : स्थानिक व पंजाबमधून आलेले हार्वेस्टर दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करीत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे.
Harvesting of wheat in progress by harvesters
Harvesting of wheat in progress by harvestersesakal

गणपूर : खानदेशात गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, स्थानिक व पंजाबमधून आलेले हार्वेस्टर दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करीत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. खानदेशात बागायत भागात विशेषतः चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, अमळनेर, साक्री, शिरपूर, शहादा, चोपडा आदी तालुक्यात गव्हाची मोठ्या प्रमाणावरील क्षेत्रावर गव्हाची पेरणी होते. मात्र यावर्षी ही लागवड काहीशी घटली आहे. (Jalgaon Inflow of wheat to market committees in district)

वातावरणातील बदलामुळे यावर्षी एकरी उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे. पेरणी काळात अवकाळी पाऊस झाल्यानेही यावर्षी पेरणी उशिरा झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. बाजारात सध्या गहू २३०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विक्री होत असून, चोपडा, अमळनेर, शिरपूर, दोंडाईचा, धुळे, बाजारात गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

चोपडा बाजारात सुमारे ७०० क्विंटल आवक होत असून, भाव २४०० ते २८०० दरम्यान आहेत तर अमळनेर बाजार समितीत सुमारे दोन हजार क्विंटलची आवक होत असून, भाव २३५० ते तीन हजार रुपये दरम्यान आहेत. दरम्यान, खेडा खरेदी सुरू झाली असून, जागेवर गहू २४०० ते २६०० रुपये प्रमाणे विक्री होत आहे.

कोरडे वातावरण फायदेशीर

सध्या कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ होऊ लागल्याने गहू काढणीस गती मिळाली आहे. तापमानात वाढ झाली असल्याने गहू पीक कोरडे होत असून, हे वातावरण पिकासाठी चांगले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढ झाल्याचे दिसून येत असून, त्यामुळे गहूदेखील चांगला पद्धतीने कोरडा होत असल्याने शेतकऱ्यांना गहू काढणे सोयीची होत आहे. (latest marathi news)

Harvesting of wheat in progress by harvesters
Jalgaon Lok Sabha Election News : निवडणुकीत विविध परवान्यांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

शेतकऱ्यांची लगबग

साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात काहीशी थंडी पडत असल्याने वातावरण संमिश्र होते; परंतु आता पंधरा ते वीस दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे गहू काढणीस मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. दरम्यान, सध्या गव्हाला भावही चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गहू पीक पूर्णता कोरडे झाल्याने मळणी यंत्राद्वारे गहू काढल्यावरदेखील गव्हामध्ये जास्त घाण राहत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

चारा टंचाईमुळे गुरांना गव्हाचे भूस

हार्वेस्टरद्वारे काढल्या जाणारे गव्हाचे भूस साठविले जात आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामात पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध झाला नाही. रब्बीतही एकच आवर्तन आल्याने चारा होऊ शकला नाही. उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होईल, याचा अंदाज बांधून यंदा प्रथमच गव्हाचे भुस साठविण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जास्त जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी मजुरांना सांगून गव्हाचे भूस जमा करून ठेवले आहे. हार्वेस्टरमधून काढलेल्या भूसही एका ठिकाणी जमा केल्याचे दिसून येत आहे.

Harvesting of wheat in progress by harvesters
Jalgaon Lok Sabha Election 2024 : पश्चिम भाग लाल दिव्यापासून वंचितच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com