
KBCNMU MASU : विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ‘उमवि’त ‘मासू’ची स्थापना
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (KBCNMU) महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (MASU) संघटनेची स्थापन करण्यात आली. (kbcnmu masu Maharashtra Students Union Organization started jalgaon news)
‘मासू’ महाराष्ट्रभर तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे.
आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात. तरीही तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समाधानकारक योग्य शिक्षण मिळत नाही, हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी ‘मासू’ कार्यरत आहे. या वेळी ‘मासू’चे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश महाजन, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख उपस्थित होते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
असे आहेत पदाधिकारी
‘मासू’च्या विद्यापीठातील मीडिया प्रमुखपदी करण शिंदे, वसतिगृह प्रमुखपदी पंकज निकुंबे, विद्यापीठ कमिटी उपाध्यक्षपदी अक्षय महाजन आणि समाधान वाघ, महिला प्रतिनिधीपदी शिवानी भगत, श्वेता बारे, स्कूल ऑफ लाइफ सायन्स प्रमुखपदी महेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.