Jalgaon News | राज्यातील सर्वाधिक ७० कोटी रु. निधी जळगाव लोकसभा मतदार संघात :खासदार उन्मेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Funds Approved News

Jalgaon News | राज्यातील सर्वाधिक 70 कोटी रु. निधी जळगाव लोकसभा मतदार संघात :खासदार उन्मेष

चाळीसगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध नऊ रस्त्यांसाठी, पंतप्रधान ग्रामसडक योजना ‘फेस थ्री’ अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या विविध रस्त्यांसाठी ७० कोटी रुपयाचा निधी मिळाला असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार पाटील यांनी सांगितले, की या योजनेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील नऊ रस्त्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ७० किलोमीटर रस्ते नव्याने होणार असल्याने मतदारसंघातील दळणवळणासाठी मोठा हातभार लागणार आहे. (Khasdar Unmesh say 70 crore highest in the state. Funding in Jalgaon Lok Sabha Constituency Jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon News : पाचोरा-जामनेरदरम्यान ‘नॅरो’चे रूपांतर होणार Broad Gaugeमध्ये! 50 किलोमीटरचा फेरा वाचणार

जळगाव लोकसभा मतदारसंघामधील ज्या रस्त्यांना निधी मिळाला, त्यात शिंदी हिरापूर अंधारी तमगव्हाण (१६ किलोमीटर), पातोंडा -वाघडू -रांजणगाव (कन्नड महामार्गापर्यंत (११ किमी), मारवड -जैतपूर(६ किमी), मुडी बोदर्डे भरवस चौबारी (९ किमी), गिरड ते तळई तालुका हद्दीपर्यंत, कासोदा ते गालापूर (७ किमी), शेवगे -पुनगाव- शेवगे बुद्रुक- कंकराज- रत्नपिंप्री (६ किमी), पासर्डी ते गोंडगाव घुसर्डी रोड (९ किमी), ममुराबाद ते नांद्रा खुर्दकडे जाणारा (५ किमी), असे जिल्ह्यातील सुमारे ७० किलोमीटर विविध नऊ रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Crime News : लॉटरीचालकावर प्राणघातक हल्ला

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी राज्यातील सर्वाधिक निधी जळगाव लोकसभा मतदारसंघात ७० किलोमीटरसाठी विविध नऊ रस्त्यांसाठी ७० कोटींचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंग, राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खासदार पाटील यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा: Nashik News : नैताळे येथे गणेश मूर्तीची विटंबना- संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

टॅग्स :JalgaonelectionFunding