Knife attack suspect in custody jalgaon crime news
Knife attack suspect in custody jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime News : चाकू हल्ल्यातील संशयिताला कोठडी

चाकू हल्ल्यातील प्रमुख संशयित सोनू ऊर्फ संदीप पारधी याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Jalgaon Crime News : लोंढवे (ता. अमळनेर) येथील चाकू हल्ल्यातील प्रमुख संशयित सोनू ऊर्फ संदीप पारधी याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Knife attack suspect in custody jalgaon crime news)

लोंढवे येथील ढाब्यावर पिण्याच्या पाण्यावरून वाद होऊन जानवे येथील संदीप ऊर्फ सोनू पारधी याच्यासह अजय पारधी, जगन्नाथ पारधी यांनी मालक मनोहर पाटील, पवन धनगर, योगेश पाटील, काळू भिल यांच्यावर चाकू हल्ला केला होता.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने अजय व जगन्नाथ पारधी या दोघांना त्याचदिवशी अटक केली होती. मात्र, सोनू पारधी हा फरार होता.

Knife attack suspect in custody jalgaon crime news
Nashik Crime News : देवळालीगावात गाड्यांची तोडफोड; 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात

अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. उपनिरीक्षक अक्षता इंगळे यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश येलमाने यांनी ११ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

यापूर्वी अटकेत असलेल्या अजय पारधी यालाही ११ पर्यंत कोठडी व जगन्नाथ पारधी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Knife attack suspect in custody jalgaon crime news
Nashik Crime: देवळालीगावात टोळक्याने केली 4 वाहने, 9 दुचाक्यांची तोडफोड; तिघांसह 2 अल्पवयीन मुलांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com