Latest Marathi News | जळगावात जमिनीचा भाव गगनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Building under construction

Jalgaon News : जळगावात जमिनीचा भाव गगनाला

जळगाव : शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक अथवा इतर कोणत्याही प्रकारचा विकास नसलेल्या जळगाव शहरात जमिनी, प्लॉटचे भाव गगनाला कसे भिडले? असा प्रश्‍न स्वाभाविक असला तरी पायाभूत सुविधांची वानवा ज्या शहरात असते त्या शहराचा विस्तार होत नाही.

आणि हा आकसलेला विस्तारच त्या शहरातील जमिनीचे भाव वाढवतो, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळेच तुलनेने जळगाव शहराच्या नंतर विकसित होऊन औरंगाबाद, अकोला, अमरावती या शहरांमध्ये पायाभूत सुविधांसह सार्वजनिक दळवळणाच्या सोयी उपलब्ध झाल्याने या शहरांचा विस्तारही झाला आणि तिथल्या जमिनीचे भावही एका ठराविक मर्यादेपलीकडे वाढले नाहीत. (Land Square plot prices increase in jalgaon jalgaon news)

हेही वाचा: Water Supply News : म्हसरूळ, बोरगडला पाणीपुरवठा उद्या बंद राहणार!

काय आहे स्थिती

गेल्या दोन दशकांत जळगाव शहरात विकासाच्या दृष्टीने फार काही बदल झाले नाहीत. उलटपक्षी जी काही विकासकामे झाली होती, त्यांचाही गेल्या आठ वर्षांत सत्यानाशच झाला. अमृत योजनेने शहराचे भले होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणीच नियोजनशून्य पद्धतीने झाल्याने चांगल्या योजनेचे ‘बारा’ कसे वाजतात, त्याचा प्रत्यय आला. दररोज पाणी नाही, चालण्याजोगेही रस्ते नाहीत. उद्योग अडचणीत, त्यामुळे रोजगार नाही. उच्च शिक्षणाच्या बाबतीत मर्यादा. अशी स्थिती असूनही जळगाव शहरात जागांचे (प्लॉट) भाव मात्र गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

मर्यादित क्षेत्र, अमर्याद दर

मुळात, जळगाव शहराची रचना लक्षात घेतली तर शहराचे सध्याचे क्षेत्रफळ ६० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त नाही. त्यातही वाढीव वस्त्यांचा भाग वगळला तर हेच क्षेत्रफळ ५० चौ.कि.मी.ही भरणार नाही. मुख्य बाजारपेठ व मध्यवर्ती क्षेत्राचा विचार केला तर आठ- दहा चौ.कि.मी.पेक्षा हे क्षेत्र जास्त नसावे. आणि या क्षेत्रातच मुळात जागा उपलब्ध नसल्याने या भागातील प्लॉटचे दर अमर्याद वाढले आहेत.

हेही वाचा: Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

पायाभूत सुविधा नाही,

म्हणून जमिनीचे दर अधिक

शहरात रस्ते, गटार, पथदीप, आरोग्य या महापालिकेतर्फे पुरवायच्या पायाभूत सुविधांचीच वानवा आहे. शहरातील मुख्य भागातील स्थिती ही असेल तर वाढीव वस्त्यांमधील स्थितीची कल्पना केलेली बरी. त्यामुळे सामान्य नागरिक अथवा व्यावसायिकही वाढीव क्षेत्रात घर अथवा आस्थापना घेण्याचे टाळतो. स्वाभाविक: त्याचा ताण शहराच्या मुख्य भागावर पडून तेथील जमिनींचा दर वाढतो.

सुविधांनंतर विकेंद्रीकरण

शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर व्यावसायिक विकासाचे विकेंद्रीकरण होते. उदाहरणादाखल शिवाजीनगर उड्डाणपुलाचे देता येईल. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर तोपर्यंत फारसा प्रकाशझोतात न आलेला शिवाजीनगरकडील परिसर प्रकाशझोतात आला. कानळदा रोडकडील ग्रामीण भागाला महत्त्व प्राप्त झाले आणि शहरातील अनेक व्यावसायिकांनी त्याठिकाणी जमिनी घेण्यास पसंती दिली.

पिंप्राळा उड्डाणपुलाचा परिणाम

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बरोबरीने आता पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम सुरु झाले आहे. तेदेखील काही महिन्यांत पूर्णत्वास येईल. त्यामुळे रिंगरोडपासून थेट शिवाजीनगर, कानळदा रोड, ममुराबाद रोडशी कनेक्ट निर्माण होईल. त्यामुळेही या भागात व्यावसायिक क्षेत्र स्थलांतरित होईल, असेही मानले जात आहे. सुरेश कलेक्शनसारख्या सर्वांत जुन्या व मोठ्या कापड दुकानाचे स्थलांतर त्याचाच भाग आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

बाजारपेठेतील व्यवहार मंदावले

शिवाजीनगर उड्डाणपूल निर्मिती व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्माणाधीन कामामुळे शिवाजीनगर परिसरात जमिनींचे व्यवहार वाढले. मात्र, गेल्या काही महिन्यांत जळगाव शहरातील मध्यवर्ती भागासह बाजारपेठेत जे व्यवहार होत होते, ते मंदावल्याचे चित्र आहे. शहराच्या चौफेर अशा पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्या भागात जमिनी आहेत, त्यांचे पर्याय उपलब्ध होतील व ज्या भागात आज मागणी आहे त्या भागातील जागांचे भाव कमी होतील, असे तज्ज्ञ सांगतात.

काय सांगताय.. ७० हजार रु. प्रति चौरस फूट!

जळगावातील प्लॉटचे दर गगनाला कसे भिडलेत, याचे अनेक किस्से अलीकडे रंगवून सांगितले जातात. रिंगरोडवर महेश प्रगती सभागृहालगत एक जुने घर २० ते २५ हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने विकले गेले. तर बळिरामपेठेत एका जागेचा व्यवहार तब्बल ७० हजार रु. प्रति चौरसफूट या दराने झाल्याचे कुणी सांगितले तर विश्‍वास ठेवावा का? असा प्रश्‍न पडेल. पण, तसे झाले हे मात्र नक्की.

हेही वाचा: SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

"पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या सोयी निर्माण झाल्यानंतर जागांचा पर्यायही उपलब्ध होतो. लोक दूरपर्यंत जायला तयार होतात व त्यामुळे मुख्य भागावरचा ताण कमी होऊन वाढीव क्षेत्रातील जमिनीला मागणी तयार होते. स्वाभाविक जागांचे दर कमी होण्यास मदत होते."

- अनीश शहा ,सहसचिव, क्रेडाई, महाराष्ट्र

"पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले तर शहराच्या विस्तारीकरणात त्याचा हातभार लागतो जळगावात नेमके तेच झालेले नाही. त्यामुळे शहराचा विस्तार खुंटला, विकासही खुंटला. दळणवळणाच्या सोयीही झाल्या नाहीत. त्यामुळे ठराविक भागातील जमिनींचे भाव वाढत राहिले."

- श्रीराम खटोड, बांधकाम व्यावसायिक

हेही वाचा: Jalgaon Crime News : गुटखा तस्कर कारसह LCBच्या जाळ्यात पावणेतीन लाखांच्या गुटखा जप्त, एकाला अटक

टॅग्स :JalgaonLandsrates hike