Nashik Crime News : वाऱ्यासारखी पसरली बातमी अन् अपहरणकर्त्यांनी घेतली धास्ती; मध्यरात्रीच चिरागची घरवापसी

Chirag Kalantri Abducted Child
Chirag Kalantri Abducted Childesakal

सिन्नर : गुरुवारी सिन्नर शहरातील वाववेस भागातील 14 चौकाच्या वाड्यात बारा वर्षीय मुलगा बाहेर खेळत असताना दोन अज्ञात इसमांनी ओम्नी गाडीत या मुलाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती.

या घटनेने संपूर्ण शहरासह जिल्ह्याला हदरा दिलेला होता. पण पोलिसांची कामगिरी व नागरिकांच्या सहकार्याने रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी या चिमुकल्यास अज्ञात इसमांनी सिन्नर नगर परिषदेतील आवारात सोडण्यात आल्याचे समजते. (Missing chirag kalantri found in front of Sinnar Nagar Parishad office in city at midnight after abduction nashik crime news)

Chirag Kalantri Abducted Child
Nashik News : गोंदे येथे अपघातात पती पत्नी गंभीर जखमी

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, तुषार कलंत्री हे कांदा व्यापारी असून त्यांचा मुलगा चिराग हा गुरुवारी रात्री 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास 14 चौक वाडा परिसरात काळेवाडा येथे खेळत असताना सफेद रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या मारुती ओम्नी गाडीतून आलेल्या अज्ञात इसमांनी चिरागचे अपहरण करुन मारुती ओम्नीतून पसार झाले.

अनेकांनी या गाडीचा पाठलाग केल्यावरही अपहरण कर्त्यांनी गाडी जोऱ्याची दामटली. यामुळे हे अज्ञात इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वडील तुषार कलंत्री यांनी चिराग घरात न आल्याने बाहेर जाऊन शोध घेतला असता, सफेद रंगाच्या मारुती ओम्नी गाडीतन आलेल्या इसमांनी चिरागला पळवले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Chirag Kalantri Abducted Child
Crime News : पोलीस असल्याची बतावणी करत लुटणारा सराईत चोरटा गजाआड

असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

तुषार यांनी लागलीच सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलगा चिरागचे अपहरण झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र चिराग ला संशयितांनी सुखरुप घरी सोडून ते फरार झाले.

चिराग स्वतःच घरी परतल्यानंतर कलंत्री कुटुंबीयांसह पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. तथापि अज्ञात व्यक्तींनी चिरागचे अपहरण केल्यानंतर त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मात्र यावेळी चिरागला पकडून गाडीत घातले त्यावेळी त्यांनी स्वतः काळे मास्क आणि काळे कपडे घातलेले होते अशी माहिती चिरागने कुटुंबीयांना दिली. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Chirag Kalantri Abducted Child
Nashik Crime News : शहरात 3 घरफोड्या; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

चिराग ची बातमी ही वाऱ्यासारखी सर्व जिल्ह्यात पसरल्याने शासकीय यंत्रणा यांना धावपळ करावी लागली. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदे करून अपहरणकर्त्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तसेच मोबाईल लोकेशनही तपासण्याचे काम सुरू असल्याचे समजत होते. त्यातच चिरागच्या अपहरण बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस ठाण्यात सिन्नर शहरातील अनेक नागरिकांची गर्दी झालेली होती.

सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच एपीआय विजय माळी त्यांचे सर्व टीम यांचे कसोटीचे प्रयत्न चालू होते. गुरुवारी रात्री अपहरणकर्त्यांनी चिरागला बारा वाजून 40 मिनिटांनी सिन्नर नगर परिषदेच्या आवारात सोडून दिल्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Chirag Kalantri Abducted Child
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com