Sakal Impact : अखेर विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा विधी पुढे ढकलला.... या तारखेपासुन परीक्षा

Letter from Department of Examination and Evaluation Board and news published by sakal newspaper
Letter from Department of Examination and Evaluation Board and news published by sakal newspaper esakal

Jalgaon News : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत विधी शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षांना २२ मेपासून सुरवात होणार होती. (law course exam was postponed jalgaon news)

मात्र, नुकत्याच झालेल्या परिक्षांचा निकाल, प्रॅक्टीकल्स आणि अभ्यासाचा ताण आदी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जळगाव-धुळे-नुंदरबार जिल्ह्यांतील प्राचार्यांनी केलेल्या विनंतीनुसार विद्यापिठाने विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

प्राचार्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या परिक्षांचा निकाल मार्चमध्ये लागला. या निकालानुसार बहुतांश विद्यार्थी दोन आणि त्यापेक्षा अधीक विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी निकालावर संशय व्यक्त केला होता. आंदोलन-मोर्चे काढण्यात येवुन पुन:तपासणीची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

याबाबतचा निकाल अद्यापही विद्यार्थ्यांना कळालेला नाही. अशातच २२ मेपासुन परिक्षांच्या तारखा जाहिर झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. या महिनाअखेर स्पर्धापरीक्षांचा लेखी पेपर असून, त्याच तारखांना विधीशाखेचे पेपर येत असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Letter from Department of Examination and Evaluation Board and news published by sakal newspaper
Sakal Exclusive : राज्यातील शिक्षकांना 'या' स्पर्धेद्वारे साडेदहा कोटी रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी!

यावर तोडगा काढण्यासाठी धुळे विधी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य व्ही. डी. चौधरी, जळगाव विधी महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. बी. वाय. रेड्डी, नंदुरबार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. चौधरी आदींतर्फे विद्यापिठाला लेखी पत्र पाठवून २२ मेपासुन होणाऱ्या लेखी परिक्षा १ जुलैपासुन घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीवरुन विद्यापिठाने परिक्षांचे वेळापत्रकच रद्द केले असून, नव्या तारखा जाहिर केल्या आहेत.

नवे वेळापत्रक असे

* विधी शाखेची प्रात्यक्षीक परिक्षा : २५ मेपासुन २ जुलैदरम्यान

* बी. ए., एल.एल.बी. सेम- iii, iv, vii, ix, x व एल. एल. बी सेम- iii, iv, v, vi लेखी परीक्षा

* डिप्लोमा कोर्सेस लेखी परिक्षा : १० जूनपासून

Letter from Department of Examination and Evaluation Board and news published by sakal newspaper
Jalgaon Temperature Rise : तापमान ४७ अंश पार...! जळगाव ठरतेय सर्वांत ‘हॉट’

* एल. एल. एम. लेखी परिक्षा : १७ जुनपासून

* बी. ए., एल.एल.बी. सेम- i, ii, v, vi व एल. एल. बी. सेम- i, ii लेखी परीक्षा : ०३ जुलैपासून

प्रॅक्टीकल्स संपेना, अभ्यास होईना

विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठी असलेले बहुतांश प्रॅक्टीकल्स हाताने लिहायचे आहेत. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट जर्नल्स, डीपीसी जर्नल्स, कोर्ट डायरी-ऑफीस डायरी, कायदाविषयक शिबिरांचा अहवाल, निबंधलेखन असे सर्व प्रॅक्टीकल्स हे स्वतः लिखाण करून येत्या १० मेपर्यंत महाविद्यालयात जमा करावे लागणार होते.

प्रॅक्टीकल्सचे लिखाण काम, स्पर्धा परीक्षांची तयारी अन्‌ त्यात महिनाअखेरच पुन्हा लेखी परीक्षेच्या तारखा आल्याने विद्यार्थी तणावात होते. विवीध व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर याबाबत रोष व्यक्त करण्यात येत होता. ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांच्या भावना प्रकर्षाने मांडून याबाबत गेल्या ८ मेस (टूडे पान १) वृंताकन केल्याने विद्यार्थ्यांनीही आभार व्यक्त केले. महाविद्यालय आणि विद्यापिठानेही विद्यार्थी हिताचा निर्णय घेत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.

Letter from Department of Examination and Evaluation Board and news published by sakal newspaper
MBBS Exam : खुशखबर! एम.बी.बी.एस. 4 ऐवजी पाचव्यांदा परीक्षा देऊन उत्तीर्णतेची संधी उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com