After an accident at Nehru Chowk, a citizen lifts a two-wheeler from a container and moves it aside.
After an accident at Nehru Chowk, a citizen lifts a two-wheeler from a container and moves it aside. esakal

Jalgaon Crime News : कंटरने दुचाकीस्वार वकिलास चिरडले; 5 दिवसात दोन वकिलांचा अपघाती मृत्यू

जळगाव : शहरातील नेहरू चौकात सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास कंटेनरने दुचाकीस्वार वकिलास चिरडले (Accident) .

ॲड. योगेश जालमसिंग पाटील (वय ४५, रा. दादावाडी) असे मृत वकिलाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांत दुसऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू झाला. (lawyer killed in bike container accident jalgaon crime news)

तमगव्हाण (ता. चाळीसगाव) येथील मुळ रहिवासी ॲड. योगेश पाटील (वय ४५) सायंकाळी नेहरू चौकातून वळण घेत असताना, कंटेनर (एमएच १९, सीवाय २२३१) चालकाने वकिलांच्या दुचाकीला (एमएच १९, सीई ६५११) धडक दिली.

यात ॲड. योगेश पाटील दुचाकीसह पुढील चाकाखाली चिरडले गेले. तत्काळ प्रत्यक्षदर्शींसह नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ॲड. योगेश यांना उचलले. त्यांना छाती, पायाला अन्‌ डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ते बोलता बोलताच शांत

अपघातानंतर ॲड. योगेश पाटील यांना उचलणाऱ्यांना त्यांनी थॅक्सही म्हटले. बऱ्यापैकी ते बोलत असल्याने किरकोळ दुखापत झाली असावी, असा समज झाला. मात्र, त्यांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने त्यांना जिल्‍हा रुग्णालयात नेले. इर्मजन्सी वॉर्डात बोलता- बोलता ॲड. योगेश पाटील शांत झाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

After an accident at Nehru Chowk, a citizen lifts a two-wheeler from a container and moves it aside.
Jalgaon Crime News : घरफोडीच्या प्रयत्नातील तिघे ताब्यात

पोलिसांनी कंटेनर सोडले अन्‌

अपघातानंतर नेहरू चौकात दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांना बोलावून कंटेनरचालकास वाहन पोलिस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, जखमीला किरकोळ मार लागला असावा, म्हणून पोलिसांनी कंटेनर सेाडून दिले. घटनेचे वृत्त कळताच ॲड. केतन ढाके, ॲड. प्रदीप महाजन, ॲड. रमाकांत सोनवणे, ॲड. सुभाष तायडे, ॲड. केदार भुसारी, ॲड. सचिन पाटील यांच्यासह अनेक वकिलांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

आज वडिलांचे श्राद्ध

ॲड. योगेश पाटील यांच्या वडिलांचे मंगळवारी श्राद्ध असल्याने त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी तमगव्हाणला गेले आहेत. न्यायालयाचे काम आटोपून ॲड. योगेश पाटीलही गावी जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

ॲड. योगेश पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेले त्यांचे चुलत मावसभाऊ ॲड. योगेश पाटील यांना त्यांच्या मित्रांकडून भ्रमणध्वनीवरून ‘तुमचा अपघात झाला का’, अशा विचारणा होवू लागली. अवघ्या तासाभरापूर्वी आम्ही दोघेसेाबत होते. ते माझ्याशी बोलून गेले अन्‌ अपघाताची घटना घडल्याचे ॲड. योगेश पाटील यांनी सांगितले.

शहर वाहतूक निद्रीस्त

शहरातील मुख्य नेहरू चौकास अतिक्रमित व्यवसायिकांसह रिक्षाचालकांचा गराडा असतो. त्यामुळे अठरा फुटांच्या रस्त्यावरून चालणेही अशक्य होते. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना, कंटेनर शहरात शिरलेच कसे? मुख्य बजारापेठेत कंटेनर फिरत असताना, एकाही वाहतूक शाखेच्या पोलिसांना ते दिसले कसे नाही, असे प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहेत.

After an accident at Nehru Chowk, a citizen lifts a two-wheeler from a container and moves it aside.
Awas Yojana : आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com