Jalgaon News : रेल्वेत विसरलेली बॅग प्रवासाला दिली परत; अधिकाऱ्यांची सतर्कता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhusawal: While giving the bag to the passenger Vijay Chaudhary, V. L. Athawale etc

Jalgaon News : अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वेत विसरलेली बॅग प्रवाशाला परत

जळगाव : मुंबई ते भुसावळदरम्यना प्रवास करणाऱ्या एक प्रवाशी ऐंशी हजार रुपये ठेवलेली बॅग रेल्वेत विसरून भुसावळला उतरला. तो प्रकार लगेच लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे फलाटावरील ‘सीटीआय’ला प्रसंग सांगितला.

त्यांनी तत्काळ संबंधित गाडीच्या ‘सीटीआय’ला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनीही बऱ्हाणपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबवून संबंधित प्रवासाची बॅग परत मिळवून दिली. (left travel bag in train with money was returned to passenger jalgaon news)

भुसावळचे रहिवासी विजय चौधरी रविवारी (ता. २२) कल्याणवरून डाउन ट्रेन (क्रमांक १२१६८)ने भुसावळला उतरले. ते बॅग घेऊन रेल्येस्थानकामधून बाहेर पडले. दुसऱ्या प्रवाशाची बॅग घेऊन आल्याचे त्यांच्या तत्काळ लक्षात आले. त्यांच्या बॅगेत लॅपटॉप व ८० हजार रुपये होते.

त्यांनी रेल्वेचे सीटीआय व्ही. एल. आठवले यांना घाबरून हा प्रसंग सांगितला. श्री. आठवले यांनी तत्काळ त्याच गाडीतील सीटीआय ए. जे. खान यांना तो प्रकार सांगितला. ज्या डब्यात श्री. चौधरी बॅग विसरले, तो डबा व बर्थ नंबर सांगितला. बॅगेचे वर्णनही सांगितले. श्री. खान यांनी तेथे जाऊन तपासले असता, त्यांना ती बॅग सापडली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : उमवि अधिसभा पदवीधर निवडणूक; मतदान प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

बॅग सापडलेले प्रवाशी इनाई मार्शी यांना हा प्रकार सांगितला. त्यांचे व भुसावळचे प्रवासी चौधरींचे बोलून करून दिले. दरम्यान, त्या गाडीनंतर लागलीच महानगर एक्सप्रेस बऱ्हाणपूरला जाणार होती. श्री. चौधरी यांना त्या गाडीचे तिकीट काढून देत पाठविण्यात आले. दुसरऱ्या प्रवाशाची गाडी बऱ्हाणपूरला उभी होती.

लागलीच दोन्ही प्रवाशांना एकमेकांच्या बॅगा देण्यात आल्या. दोन्ही प्रवाशांनी भुसावळ विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. रेल्वेच्या चांगल्या प्रतिमेबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे. यात ‘सीटीआय’ व्ही. एल. आठवले, के. के. तांती, एन. बी. राठोड, मनीष सिंग, ए. जे. खान यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

हेही वाचा: Cyber Crime : टेलर व्यावसायिकाची 55 हजारांत फसवणूक

टॅग्स :Jalgaonrailwaybags