Jalgaon Cyber Crime : टेलर व्यावसायिकाची 55 हजारांत फसवणूक

Cyber Crime
Cyber Crimeesakal

जळगाव : अनोळखी व्यक्तीने विश्वास संपादन करून शहरातील संभाजीनगरातील टेलर व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन ५४ हजार ८०० रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक केली. (cyber crime unknown person cheated bank account of tailor businessman by withdrawing mutual online payment jalgaon news)

सुभाष शालिग्राम इंगळे (वय ४९, रा. संभाजीनगर) यांचे टेलरिंगचे दुकान आहे. कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करतात.

१७ जानेवारीस दुपारी दीडला ते दुकानात असताना, त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यांचा विश्वास संपादन करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फोन पेवरून ऑनलाइन बँक खात्यातील ५४ हजार ८०० रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक केली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Cyber Crime
Maharashtra Chitrarath: प्रजासत्ताक दिनाची जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुभाष इंगळे यांनी शनिवारी (ता. २२) सायंकाळी सातच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक युनूस तडवी तपास करीत आहेत.

Cyber Crime
Jalgaon News : उमवि अधिसभा पदवीधर निवडणूक; मतदान प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com