Jalgaon Leopard News: बिबट्या 13 पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत; महिला वन अधिकारी शीतल नगराळे यांच्या प्रयत्नांना यश

A female leopard coming to pick up her cubs was captured on a troop camera installed by the forest department in a sugarcane field.
A female leopard coming to pick up her cubs was captured on a troop camera installed by the forest department in a sugarcane field.esakal

Jalgaon Leopard News : आई आणि तिच्या बाळाचे अतूट नाते असून, त्याला वन्यप्राणी देखील अपवाद ठरत नाही. आपल्या पिलांपासून ताटातूट झाल्यानंतर बिबट्यासारखे प्राणी अस्वस्थ होतात. प्रसंगी ते अधिक हिंस्र देखील होऊ शकतात.

गेल्या दोन वर्षांत जंगल परिसरात आपल्या आईसोबत फिरताना ताटातूट झालेल्या अशाच सुमारे १३ बछड्यांना त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना यश आले आहे.(Leopard 13 cubs back in mother arms in jalgaon news)

चाळीसगाव तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर जंगल होते. त्यामुळे जंगली श्वापदांचा अधिवास मोठा होता. कालांतराने वाढती लोकसंख्या, जंगलतोड व जंगलातील अतिक्रमणांमुळे वन्यप्राण्यांना पुरेशा प्रमाणात जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तींमध्ये दाखल होत असल्याचे दिसून येतात. यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.

विशेषतः गिरणा नदीकाठच्या परिसरात पाणी असल्याने या भागात सुरवातीपासूनच बिबट्या आढळून येतात. या भागात आपल्या आईपासून ताटातूट झालेली बिबट्याची पिले अनेकदा शेतांमध्ये आढळून आली आहेत. दोन वर्षांत तब्बल १३ पिलांची त्यांच्या आईसोबत येथील वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी आपले सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने भेट घडवून आणली आहे.

बिबट्या हा प्राणी सहसा दिवसा न फिरता, रात्रीच्या सुमारास फिरतो. आपल्या घराजवळ राहून बिबट्या आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना काही दुखापत होत असेल तर किंवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होत असेल तर बिबट स्वतःच्या रक्षणासाठीच हल्ला करतो.

तिसऱ्यांदा घडवून आणली भेट

बहाळ (ता. चाळीसगाव) येथील राजेंद्र महाजन यांच्या शेतात गुरुवारी (ता. २३) दुपारी दोनला ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना बिबटची दोन पिले आढळून आली होती. यापूर्वी देखील याच पिलांना वन विभागाने दोन वेळा त्यांच्या आईची भेट घडवून आणली होती. वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कुठेही, अशी पिले आढळून आल्याचा निरोप मिळाल्यानंतर त्या तातडीने घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल होतात.

A female leopard coming to pick up her cubs was captured on a troop camera installed by the forest department in a sugarcane field.
Jalgaon Leopard News : मांडवेजवळ मृत बिबट्या आढळल्याने खळबळ

पिलांची आई आपल्या पिलांसाठी कुठे येऊ शकते, याचा शीतल नगराळे या अंदाज घेतात आणि पिलांना त्यांच्या आईशी भेट घडवून आणतात. पिलांची आई जेव्हा आपल्या पिलांना भेटते, तो प्रसंग आजूबाजूला लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला जातो. बहाळ (ता.चाळीसगाव) येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्याची मादी आपल्या पिलांना घेऊन गेल्याने तिसऱ्यांदा ही पिले आपल्या आईजवळ गेल्याचे दिसून आले.

''मी स्वतः आई असल्याने बिबट्यापासून तिची पिले वेगळी झाल्यानंतर आईला काय दुःख होत असेल हे मी समजू शकते. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर पुन्हा या पिलांना त्यांची आई कधी भेटेल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असतो. जेव्हा ही भेट घडते, तो प्रसंग मन हेलावणारा असतो. आपल्या हातून चांगले काम होत असल्याचे समाधान वाटते.''- शीतल नगराळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव

A female leopard coming to pick up her cubs was captured on a troop camera installed by the forest department in a sugarcane field.
Jalgaon Leopard News : आडगावात उसाच्या फडात बिबट्याचा थरार; शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

गावे आढळून आलेली पिले

वडगाव लांबे ......... ०१

शिदवाडी ............. ०१ (मृत)

वलठाण .............. ०३

बहाळ ................ ०१

(पुनर्मिलन न होता रेस्क्यू सेंटरमध्ये सोडले)

पिंप्री .................. ०३ (१ मृत)

तिरपोळे .............. ०१

गुढे ................... ०२

कोळगाव ............. ०१

A female leopard coming to pick up her cubs was captured on a troop camera installed by the forest department in a sugarcane field.
Jalgaon Leopard News: दोन्ही बछडे अखेर आईच्या कुशीत! वन विभागाच्या प्रयत्नांना यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com