
Jalgaon : जनावरांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद
बातमीदार : जीवन चव्हाण
चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील मुंदखेडे बुद्रुक येथे जनावरांचा बळी घेण्यासह दहशत पसरविणाऱ्या बिबट्याच्या चित्तथरारक पाठलाग करून वनविभागाने अखेर शुक्रवारी रोजी पहाटे जेरबंद केले आहे. यामुळे गावातील नागरिक आता भयमुक्त झाले आहे. (leopard finally jailed Jalgaon Latest Marathi News)
तालुक्यातील मुंदखेडा बुद्रुक गावांसह शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यात त्यांनी तीन जणावरे फस्त केल्या. शेतकरी निंबा नामदेव पाटील, गोकुळ शिवाजी पाटील यांच्या जणावरांचा बिबट्याने फडशा पाडला.
यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत होता. याबाबत वनविभागाने वारंवार सतर्क राहण्याचे इशारा नागरिकांना देण्यात येत होत्या. या दरम्यान चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी गावकऱ्यांच्या मनातील भिती दूर करून धिर दिला. यामुळे काही प्रमाणात गावातील नागरिकांना दिलासा मिळाला.
तत्पूर्वी या परिसरात नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपिंग, आणि प्रोबोधनपर कार्यक्रम देखील वनविभागामार्फत घेण्यात आले. तरीही पशु धनावरील हल्ल्याच्या घटना वाढत होत्या. त्यानुसार संभाव्य मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनसंरक्षक दि. वा. पगार, (धुळे) व उपवनसंरक्षक विवेक होशिंग जळगाव यांच्या आदेशानुसार गुरूवार रोजी प्रकाश पाटील यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला.
हेही वाचा: Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद
बिबट्या जाळ्यात अडकण्यासाठी त्यात बोकड बांधण्यात आले. व मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्यासह सहकारी निघून गेले. तेव्हा बोकड खाण्यासाठी आला असता तिन वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर भयभीत नागरिक वा शेतकऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला. उप वनसंरक्षक यांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सदर मोहीम जिल्हा वन संरक्षक विवेक होसिंग, सहा वनसनरक्षक एस. के. शिसव, जळगाव, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्यासह सहकारी विवेक देसाई , वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल जी. एस. पिंजारी, आर. वी. चौरे, वनरक्षक एस. बी. चव्हाण, आर. बी. पवार, आर. आर. पाटील, वाय. के. देशमुख, के. बी. पवार, एम. पी. शिंदे, अश्विनी ठाकरे, वनमजुर बाळू शितोडे, श्रीराम राजपूत, भटू पाटील, संजय देवरे, चालक राहुल मांडोळे, संजय गायकवाड या पथकाने फत्ते करून दाखवले. याबाबत वनविभागाचे नागरिकांमधून आभार मानले जात आहे.
हेही वाचा: संततधारेने करपल्याने 2 एकर मक्यावर फिरवला नांगर
Web Title: Leopard Finally Jailed Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..