जळगाव : अल्पवयीन मुलींची फसवणूक त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा गजाआड | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suspect

जळगाव : अल्पवयीन मुलींची फसवणूक त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारा गजाआड


जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथील २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचे सहा महिन्यांपूर्वी अपहरण (kidnap) केले होते. गुन्हे शाखेने पीडितासह संशयिताला अटक केली असून, त्याने यापूर्वी अशाच एका मुलीला पळवून नेत सज्ञान झाल्यावर सोडून दिल्यावर तिचा मृत्यू झाला होता.

Social media चा वापर करून मुलींची फसवणूक

शहरातील गणेश कॉलनीतील सतरावर्षीय मुलीला कृष्णा गोरे (वय २४, रा. कुसुंबा) याने अपहरण करून नेले होते. त्या मुलीशी लग्न करून तो तिला घरी घेऊन आला. ती घरीच राहात असताना कृष्णाने वराडसीम (ता. भुसावळ) येथील सतरावर्षीय दुसऱ्या मुलीसोबत समाजमाध्यमांवर मैत्री करून तिला घेऊन पसार झाला होता. याच दरम्यान लग्न करून आणलेल्या मुलीचा ५ नोहेंबर २०२१ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मुलीचे पिता राजेंद्र खैरनार यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासाची सूत्रे गुन्हे शाखेला सोपविल्यावर निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तपास चक्रे फिरविली.

हेही वाचा: जळगावात शासनाचं पोर्टल हॅक; बोगस लसीकरण प्रकरणी 34 जणांवर गुन्हा

पीडित सहा महिन्यांची गर्भवती

कृष्णा गोरे याने पळवून नेलेल्या पीडितेवर सलग वर्षभर अत्याचार केल्यावर ती गर्भवती राहिली असून, गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक बकाले यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देवरे, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगिता पाचपांडे, मुरलीधर बारी अशांच्या पथकाने कल्याण (जि. ठाणे) गाठले. येथे भाड्याची खोली घेऊन वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून, पीडितेसह त्याला ताब्यात घेत रात्री पथक जळगावी धडकले.

हेही वाचा: निषेधार्ह! पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top