
जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील दहीगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातील २५ वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यान्वये येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलीस पोलिसांनी कुटुंबांच्या स्वाधीन करून तरुणास अटक केली व त्यास विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दहीगाव (ता. यावल) येथून ८ मेस पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस धीरज रतिलाल माळी याने फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी पीडिताच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा येथील पोलिसांत दाखल झाला होता. तेव्हापासून या पीडिताचा शोध पोलिस घेत होते. मंगळवारी (ता. १०) दोघांना ताब्यात घेण्यात आले. पीडिताच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. संशयित धीरज माळी याच्यावर अपहरणासह पोस्को अन्वये लैंगिक अत्याचाराचे कलम वाढविले आहेत. त्यास बुधवारी (ता. ११) जळगाव जिल्हा विशेष बालन्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर तपास करीत आहेत.
हेही वाचा: ''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम
हेही वाचा: आईच्या शेतावरून पेटली भावंडात ‘भाऊबंदकी’; नातवाने गमावले प्राण
Web Title: Man Arrested For Torturing Minor Girl Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..