
Jalgaon News : MIDCत गृहस्थाचा मृतदेह आढळला
Jalgaon News : एमआयडीसी परिसरातील गोपाल दाल मील भागात एका तरूणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ४) उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय ४०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयताचे नाव असून, तो जलाराम चटाई कंपनीत कामाला होता. (Man body found in MIDC Jalgaon News)
तर, त्याचे दोन भाऊ मिरचीचा व्यवसाय करतात. शुक्रवार आणि शनिवारी चंद्रशेखर हा त्यांना मदत करण्यासाठी गेला होता.
सायंकाळी सहानंतर तो कामानिमित्त कंपनीत गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. रविवारी सकाळी कंपनीजवळच त्याचा मृतदेह आढळून आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
चंद्रशेखरचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शविविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा जयेश (वय ७), तसेच मनोज व शशिकांत हे दोन भाऊ असा परिवार आहे.