Jalgaon : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain snatcher

Jalgaon : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

जळगाव : दूध घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र (Gold Chain) पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तोडून दुचाकीस्वार (Thieves) भामट्यांनी पळ काढला. रविवारी (ता. ३) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रामानंदनगर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Mangalsutra stolen under pretext of asking for address Jalgaon Crime news)

हेही वाचा: जळगाव : कोल्हे हिल्स परिसरात आढळला दुर्मिळ पांढरा साप

शहरातील जीवननगरात शालिनी दिगंबर पाटील (वय ६५) वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा पुणे येथे राहत असल्याने त्या येत-जात असतात. रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शालिनी पाटील दूध घेण्यासाठी गेल्या. घरापासून थोड्याच अंतरावर दोन दुचाकीस्वारांनी त्यांना आवाज देत थांबवले. दुचाकीवर मागे बसलेल्या भामट्याने त्यांना हातातील चिठ्ठी दाखवित साईनगर कुठे आहे, असा पत्ता विचारला. शालिनी पाटील यांना चिठ्ठी दाखवल्यावर एकाने शालिनी पाटील यांच्या गळ्यातील काळे मणी असलेले मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मोटारसायकवर मागे बसलेल्या भामट्याने काळा मास्क घातला होता. दोघेही काळ्या रंगाच्या मोटारसायलवरुन आले होते. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडल्यामुळे त्या चोरट्याने नख त्यांना लागले असून त्यांना मानेवर जखम झाली आहे. शालिनी पाटील यांनी तत्काळ रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

हेही वाचा: Jalgaon : नराधम बापाकडून पेाटच्या मुलीवर अत्याचार

Web Title: Mangalsutra Stolen Under Pretext Of Asking For Address Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..