बँकेत नोकरीचे आमीष; एचडीएफसीचे दिले नियुक्‍तीपत्र पण..

job offer
job offer

जळगाव : खासगी बँकेत दांडग्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवत बेरोजगार तरुणाची तब्बल ९३ हजारात फसवणुक करण्यात आली होती. रजिष्ट्रेशनसह वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळून एचडीएफसी बँकेचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले होते. सायबर पेलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी दिल्ली गाठून संशयीताच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटकेतील भामटा अनिल कुमार बोगस कॉलसेंटर चालवत असून देशभरातील अनेक बेरोजगारांना त्याने गंडवल्याची शक्यता आहे. 

म्हसावद (ता.जळगाव) येथील उच्चशिक्षीत तरुण सचिन संजय मराठे हा बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात होता. त्याने https://www.naukri.com या ऑनलाईन बेबसाईटवर रजिष्ट्रेशन केले होते. खासगी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमीष देत २२ ऑगस्ट २०१८ रोजी रविसिंग, करन भातपुर, संग्राम भालेराव, करन लुत्रा, अनुभुती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी मोबाईलवर संपर्क केला. 

दोन बँकांच्या खात्‍यावर पैसे
बँकेत नोकरीसाठी बेवसाईटवर रजिष्ट्रेशन, कागदपत्रे आणि इतर सर्व पुर्तता केल्यावर ऑनलाइृन इंटरव्हूव आणि लॅपटॉप किट देण्याच्या नावे, प्रोसेसिंग फि अशा विविध कारणास्तव सचिन मराठे याच्याकडून वेळोवेळी पंजाब नॅशनल बँक आणि सिंध बँक अशां देान बँकाच्या खात्यांवर ९३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर सचिन मराठे या तरुणाला एचडीएफसी बँकेत नोकरीचे आश्वासन देत खोटे नियुक्तीपत्र सोपवण्यात आले. तरुणाने खात्री केल्यावर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड होऊन सायबर पेलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात भामट्यांच्या नावाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

राजधानीत आवळल्या मुस्क्या 
संशयीतावर गेली ५ महिने सायबर पोलिस ठाण्याचे पथक पाळत ठेवुन होते. विक्रम यादव ऊर्फ अनिल कुमार, रा. उत्तमनगर) व त्याचा साथदार राहुल मदनलाल चौरसीया (आझाद नगर चंदौली, युपी. हमु उत्तम नगर नवी दिल्ली)अशा देाघांची नावे निष्पन्न झाल्यावर पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक बळीराम हिरे, यांच्या पथकातील उपनिरीक्षक अंगत नेमाने, बाळकृष्ण पाटिल दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, दिपक सोनवणे, गौरव पाटिल,यांच्या पथकाने दिल्ली गाठली. नरेंद्रवारुळे यांनी जळगावहुन तांत्रिक मदतीची पुर्तता करुन २ दिवस दिल्लीतच मुक्काम ठोकुन पथकाने संशयीत अनिल कुमार ऊर्फ विक्रम यादव यास अटक केली. अटकेनंतर संशयीताला न्यायालयात हजर केल्यावर पेालिस कोठडीत रवानगी करण्यात आली असुन सायबर पेालिसांनी बँकखाते सिझ करुन सचिन मराठे याचे ९३ हजार परत मिळवून दिले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com