भाजपतर्फे गृहमंत्र्यांच्या पुतळ्यास काळे फासून जाळला; जळगावमध्ये ठाकरे सरकार विरोधात घोषणा

anil deshmukh
anil deshmukh

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याळा टॉवर चौकात काळे फासले. विशेष म्हणजे आंदेालनास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे, आंदोलन स्थळापासून होकच्या अंतरावर शहर पोलिस ठाणे होते. तब्बल अर्धातास चाललेल्या आंदोलनादरम्यान ना पोलिस आले, ना त्यांनी आंदेालकांना पुतळ्याला काळे फासण्यापासून व जाळण्यापासून हटकाव केला, हे विशेष होय. 

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारमध्ये सावळा गोंधळ असल्याचा आरो भाजपने केला आहे. कालच माजी पोलीस संचालक परमवीर सिंग यांनी पत्राद्वारे मोठा गौप्यस्फोट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटीचीं मागणी केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकार भ्रष्टाचारी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आज भाजप कार्यालय येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे आदीच्या उपस्थितीत घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला. १०० कोटी खंडणी मागणाऱ्या, वसुली मंत्री अनिल देशमुख व ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हा मोर्चा भाजप कार्यालयातून टॉवर चौक येथे आला. तेथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले, जोडे मारण्यात आले. जिल्हा पदाधिकारी महेश जोशी, नितीन इंगळे, सुशिल हसवानी, प्रदिप रोटे, महेश चौधरी, वंदना पाटील, किशोर चौधरी, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, धिरज वर्मा, गणेश माळी, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे, मयूर कापसे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, धिरज सोनवणे, विजय पाटील, अमित काळे, दीपक पाटील, मंडळ अध्यक्ष अजित राणे, संजय लुला, विनोद मराठे, अरविंद देशमुख, आघाडी अध्यक्ष आनंद सपकाळे, लताताई बाविस्कर, गणेश वाणी, अनिल जोशी, रेखा पाटील, तृप्ती राहुल पाटील, युवा मोर्चाचे अक्षय जेजुरिकर. मिलिंद चौधरी महेश पाटील जितेंद्र चौथी गणेश महाजन सचिन चव्हाण सचिन सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, सागर जाधव, प्रतिक शेठ, योगेश बागडे, सुहास जोशी, ग्रामीणचे गोकुळ भंगाळे, चंद्रशेखर अत्तरदे, संदीप पाटील, गौरव सणस आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com