एरंडोल तालुका कोरोनामुक्तीकडे; रिकव्हरी रेट ९४ टक्के

एरंडोल तालुका कोरोनामुक्तीकडे; रिकव्हरी रेट ९४ टक्के
corona fight
corona fightcorona fight

एरंडोल (जळगाव) : प्रशासनाने योग्य नियोजन करून लॉकडाउनची कडक (Jalgaon erandol lockdown) अंमलबजावणी केल्यामुळे एरंडोल तालुक्याची कोरोनामुक्तीकडे (Corona free) वाटचाल सुरू केली आहे. तालुक्याचा कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९४.४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, रुग्णसंख्या १३९ पर्यंत खाली आली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत (Jalgaon corona recovery rate) होणारी वाढ यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन केल्यास आठ दिवसांत तालुका कोरोनामुक्त होईल, असा विश्वास प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी व्यक्त केला. (jalgaon-news-corona-update-erandol-taluka-towards -corona-free)

corona fight
आशादायक..जिल्हा कोविड रुग्णालयातील १७० बेड रिकामे

तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे यांच्यासह पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीत तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.

तालुक्‍यात केवळ १३९ ॲक्‍टीव रूग्‍ण

सद्य:स्थितीत तालुक्यात केवळ १३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात ६ हजार ६८२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, तर ६ हजार ३१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात कोरोना बळींची संख्या २२९ वर पोहोचली असून, १३९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यामध्ये शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील १०३ रुग्णांचा समावेश आहे. म्हसावद रस्त्यावरील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये दोन रुग्ण असून, ग्रामीण रुग्णालयात अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वीस रुग्ण गृहविलगीकरण कक्षात आहेत. तसेच जळगाव येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयात प्रत्येकी ४४ अशा ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पाच रुग्णांवर पाचोरा येथे तर १४ रुग्णांवर एरंडोल येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

corona fight
फळविक्रेत्‍यांकडून पोलिसास मारहाण; अकरानंतर बाजार बंद करण्याचे कारण

शिक्षकांकडून वीस ऑक्‍सिजन सिलिंडर

तालुक्यात मार्चमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. प्रांताधिकारी गोसावी यांनी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. आवाहनास दानशूर व्यक्तींनी तसेच शिक्षक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी दहा तर माध्यमिक शिक्षकांनी दहा असे वीस जम्बो सिलिंडर ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिले. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनची शहरात कडक अंमलबजावणी करण्यात आली.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

प्रांताधिकारी गोसावी, पोलिस निरीक्षक जाधव, सहाय्यक निरीक्षक देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच विनामास्क फिरणारे व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे शहरात रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी गोसावी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com