जळगावला नवे बाधित पाचशेच्या टप्प्यात पण दिवसभरात ११ बळी

जळगावला नवे बाधित पाचशेच्या टप्प्यात पण दिवसभरात ११ बळी
jalgaon corona update
jalgaon corona updatejalgaon corona update

जळगाव : महिनाभरापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या पाचशेच्या टप्प्यात आली असून मंगळवारी साडे सहाशेहून अधिक रुग्ण बरे झाले. तर गेल्या २४ तासांत ११ जणांचा बळी गेला.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता मार्च व एप्रिल महिन्यात प्रचंड वाढल्यानंतर मे महिन्यात उतरता आलेख सुरु झाला आहे. तीन आठवड्यांपासून दररोजचे बाधित कमी व बरे होणारे अधिक आढळून येत आहेत. मंगळवारी नवे ५२१ रुग्ण समोर आले, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३६ हजार २८५वर पोचली. तर ६६५ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २४ हजार ३४६ झाला आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रिकव्हरी रेट ९१.२४ टक्के झाला आहे.

शहराची चिंता कायम

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत ११ जणांचा बळी गेला, बळींचा आकडा २४३८ झाला असून नॉन कोविड, सारी, न्युमोनिया व कोविड संशयित अशा ६ जणांचा मृत्यू झाला. बळींचा आकडाही नियंत्रणात असला तरी जळगाव शहरात मृत्युचे प्रमाण जास्त आहे. मंगळवारीही शहरातील ५ जणांचा बळी गेला. मंगळवारी रॅपीड ॲन्टीजेन व आरटीपीसीआर अशा ७ हजार २७६ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहरात मंगळवारी नवे ५१ रुग्ण आढळले, तर तब्बल १३५ जण बरे झाले. जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ५१, अमळनेर ४, चोपडा ५४, पाचोरा ३, भडगाव २, धरणगाव १४, यावल ३७, एरंडोल १९, जामनेर ७०, रावेर ५०, पारोळा १५, चाळीसगाव ७०, मुक्ताईनगर ४४, बोदवड १५, अन्य जिल्ह्यातील ९.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com