शटर बंद, विनामास्क आतमध्ये बस्ता; दुकान मालकाविरुद्ध गुन्हा

दुकान मालकाविरुद्ध गुन्हा
corona lockdown rules not follow
corona lockdown rules not followcorona lockdown rules not follow

जळगाव : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र जिल्हाधिकारी यांनी बंदचे आदेश दिले असतांनाही अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्या शहरातील फुले मार्केट येथील समाधा फॅशनमध्ये पोलिसांनी छापा टाकला. आत चक्क लग्नाचा बस्ता होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी दुकान मालक विशाल ग्यानचंद ठारानी (वय ३३, रा. सिंधी कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याबाबतचे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश आहेत. बुधवारी (ता.१४) शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, अक्रम शेख फुले मार्केट परिसरात गस्त घालत होते. या वेळी त्यांना मार्केटमधील ‘समाधा’ नावाचे कपड्याचे दुकानाचे (२२५) शटर अर्धे उघडे दिसले.

दुकानातील कामगारांसह ग्राहकांना दंड

चौकशी केली असता यात दुकानात विनामास्क ग्राहक बसल्याचे तर त्यांना दुकान मालक विशाल ठारानी स्वतः विनामास्क कपडे दाखवताना आढळून आले. जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत विनामास्क चार नोकर, तीन ग्राहकांना प्रत्येकी ५०० रुपये दंडाची कारवाई केली. पोलिस नाईक चव्हाण याच्या फिर्यादीवरून दुकान मालक ठारानी यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वसुली पुरती किरोकोळ विक्रेत्यांवर कारवाई

भाजीविक्रेत्यांवर कारवाई करून आपला बडेजाव दाखविणारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभाग, फुले मार्केटमध्ये वसुली पुरती कारवाईला येतात. मार्केटमध्ये अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू असणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा पोलिस कारवाईत सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com