पत्‍नी माहेरी गेली असताना त्‍याने संपविले जीवन

रईस शेख
Sunday, 24 January 2021

पत्नी आरती ही काही दिवसांपासून (पाचोरा) माहेरी गेली आहे. रविवारी सकाळी पांढरी प्लॉट भागातील रहिवासी कामासाठी घरी आले असता, आनंद याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरामधील पांढरी प्लॉट भागात आनंद शंकर पाटील (वय ३०) या प्लंबरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना (२४ जानेवारी) सकाळी घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

पिंप्राळा पांढरी प्लॉट येथे आनंद शंकर पाटील हे पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी आरती ही काही दिवसांपासून (पाचोरा) माहेरी गेली आहे. रविवारी सकाळी पांढरी प्लॉट भागातील रहिवासी कामासाठी घरी आले असता, आनंद याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याने शेजारीच राहणाऱ्या आनंदचा भाऊ यास प्रकार कळविला. त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी लिलाधर महाजन यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांच्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मेहरुण ट्रॅकवर तरुणीचा विनयभंग 
शाळेच्या पैशांच्या वादातून जिल्हा न्यायालयात दिलेली साक्ष मागे घ्यावी या मागणीसाठी तरुणीचा अरस्ता अडवून विनयभंग केल्या प्रकरणी एमआयडीसी पेलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रार कर्त्यांतरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या मेहरुण तलाव चौपाटीवर मैत्रीणीसह फिरत असतांना मनिष रमेश कथुरीया (ता.जळगाव) हा तेथे आला व त्याने शिवीगाळ करुन अंगलट करत शारीरीक छेड काढल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तपास पोलिस नाईक नितीन पाटील करत आहे. 

पुन्हामहिलेचा मोबाईल लंपास 
शहरातील पार्वतीनगरातील गृहीणी नेहमी प्रमाणे मोहाडीरेड लांडोरखोरे परिसरात पायी मॉर्निंग वाक करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हातातून हिसकावुन पळ काढला. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पार्वतीनगर परिसरातील रहिवासी पुनम जिवन येवले (वय ३५) या नेहमीप्रमाणे लांडोरखोरी उद्यान मोहाडी रेाड येथे वॉकसाठी गेल्या होत्या. पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास पायी चालत असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरुन पेबारा केला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news plamber suicide home