ऑनलाईन स्वस्त कार भावली; ३५ हजारात झाला सौदा, भरले ७२ हजार तरीही कार येईना 

online fraud
online fraud

जळगाव : फेसबुक ॲपवर ओमणी कार विक्रीच्या जाहिरातीतून शिरसोली येथील तरूणाची ७२ हजारात फसवणुक झाली. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर गंडवले गेल्याचे निदर्षनास आल्याव शुक्रवारी २९ रोजी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांत दाखल तक्रारीनुसार शिवकुमार शुकलाल बारी (वय २७, रा. शिरसोली) खासगी नोकरी करतात. त्यांच्या स्मार्टफोनवर कार विक्रीची जाहिरात झळकली. कार आवडल्याने जाहीरातीवर दिलेल्या नंबरवर ५ सप्टेंबर २०२० रोजी संपर्क साधून शिवकुमार यांनी माहिती घेतली. स्वस्त आणि वाजवी दरात अवघ्‍या ३५ हजारात दाराशी कार उभी राहणार म्हणुन सौदा झाला. समोरील अज्ञात व्यक्तीने शिवकुमार यांच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर कारचे फोटो आणि बनावट कागदपत्रे पाठविले. 

म्‍हणे गाडी ट्रान्सपोर्टने येणार
शिवकुमार यांनी ऑनलाईन ३ हजार ५०० रूपये पाठवून ओमनी वाहन बुक केले. दोन दिवसानंतर पुन्हा शिवकुमार यांनी संबंधित नंबरवर संपर्क साधला; तुमची गाडी ट्रान्सपोर्टने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने उर्वरित रक्कम ऑनलाईन पाठवा असे सांगितले. त्यानुसार बारी यांनी टप्याटप्याने एकुण ७२ हजार ५०० रूपये ऑनलाईन पाठविले. तरीही कार येत नाही म्हणुन त्यांनी पेालिस ठाणे गाठले. 

तक्रार घेण्यास टाळाटाळ 
एमआयडीसी पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करता, आपली फसवणूक झाली तरी देखील पोलीसांकडून कोणतीही मदत होत नसल्याने शिवकुमार बारी यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. साडे तीन महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवार २९ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com