बोरी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन

संजय पाटील
Saturday, 19 December 2020

समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी तीन आवर्तन तर पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन अशी चार आवर्तन सोडण्याच्या सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या होत्या.

पारोळा (जळगाव) : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने गिरणा व बोरी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असुन रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. यातील पहिले आवर्तन आज (ता. 19) सकाळी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात आले. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतशिवार हिरवाईने बहरण्यास मदत होणार आहे.

नक्‍की वाचा- कुंझरकरांच्या मृत्यूचा उलगडा; दोन तास मारहाण बघ्यांनी पाहिली पण..

खरीप हंगामात कोरोनाचे गडद सावट असल्याने या वर्षी शेतकऱ्यांना उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी तीन आवर्तन तर पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन अशी चार आवर्तन सोडण्याच्या सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभुमीवर आज बोरी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

क्‍लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्‍या घडामोडी जाणून घेण्यासाठी

बोरी मध्यम प्रकल्प 
शेतकऱ्यांनी सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सिंचनाकरिता पाणी सोडल्यामुळे सर्व शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. कालवा सोडताना उपविभागीय अभियंता एम. आर. मीठ्ठे, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, अजिंक्य पाटील, स्थापत्य सांख्यिक सहाय्यक व्ही. एम. पाटील आदी उपस्थित होते.

- डावा कालव्यातून लाभ मिळणारी गावे 
तामसवाडी, टोळी, शेवगे, पिंप्री, हिवरखेडे, मुंदाणे, सोके, मोंढाळे, करंजी. 

- उजव्या कालव्यातुन लाभ मिळणारी गावे
जोगलखेडा, उडणीदिगर, उडणी खालसा, मेहु, टेहु, कामतवाडी, वाघरे, पारोळा, विचखेडे, पुनगांव, शेवगे, महाळपुर. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola first cycle from the bori project