दहा वर्षांपुर्वी जमिन खरेदीची सौदापावती; अकरा लाखाची फसवणूक

दहा वर्षांपुर्वी जमिन खरेदीची सौदापावती; अकरा लाखाची फसवणूक
fraud case
fraud casefraud case

जळगाव : शेतजमिनीवर मॅनेजर मामलेदाराचे नाव असून, ते कमी करून ती शेतजमीन स्वस्तात मिळवून देतो, असे सांगत रमेश चौधरी (रा. नित्यानंदनगर) यांची अकरा लाखांत फसवणूक (Land purchase Fraud case) केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत फसवणुकीचा (Erandol Police case) गुन्हा दाखल झाला. (jalgaon-police-fir-land-purchase-ten-years-ago-fraud-case)

एरंडोल तालुक्यातील जळू शिवारातील शेतजमिनीवर (गट नं. २४६) तालुक्यातील मॅनेजर मामलेदारांचे नाव होते. या मिळकतीबाबत पाडुरंग पाटील यांनी मॅनेजर मामलेदारांचे नाव कमी करून ती जमीन स्वस्तात खरेदी करून देतो, असे रमेश चौधरी यांना सांगितले. याबाबत २४ नोव्हेंबर २०११ मध्ये सौदापावती व करारनामा करून देत अकरा लाखांत सौदा ठरला होता. त्यावर जमिनीचे मूळ मालक पांडुरंग पाटील यांनी संमती म्हणून सहीही केली होती.

fraud case
जिल्ह्यात नेत्रदानाद्वारे २३७ जणांनी पाहिली सृष्‍टी

करारनाम्‍यानुसार अकरा लाख दिले

व्यवहारापोटी रमेश चौधरी यांनी पांडुरंग पाटील यांच्या सांगण्यावरून विनायक ठाकूर यांना बयाणा म्हणून दोन लाखांचा धनादेश, तर एक लाख रुपये रोख दिले होते. उर्वरित रक्कम खरेदी खतावेळी देण्याचे ठरले होते. मात्र, नाव कमी करण्यासाठी पैसा लागत असल्याचा बहाणा करून विनायक ठाकूर याने वेळोवेळी पैसे उकळले. करारनाम्यानुसार त्यांना अकरा लाख रुपये मिळाले असल्याचे त्यांनी केलेल्या बयाणा पावतीत नमूद केले आहे.

अतिरिक्त पैशांची मागणी

खरेदी खत करून देण्यासाठी चौधरी यांनी विनायक ठाकूर व पांडुरंग पाटील यांना वारंवार विनवण्या केल्या. मात्र, ते खरेदी खत करून देत नव्हते, म्हणून चौधरी यांनी ॲड. राजेश सोनवणे यांच्यामार्फत ६ ऑक्टोबर २०२० ला नोटीस पाठविली. त्यांनी नोटीस घेण्यास नकार देत अतिरिक्त पैशांची मागणी केली. याप्रकरणी रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसांत विनायक ठाकूर (रा. एरंडोल) व पांडुरंग पाटील (रा. गिरणा कॉलनी, चोपडा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com