जिल्ह्यात नेत्रदानाद्वारे २३७ जणांनी पाहिली सृष्‍टी

जिल्ह्यात नेत्रदानाद्वारे २३७ जणांनी पाहिली सृष्‍टी
eye donation day
eye donation dayeye donation day

जळगाव : जगभर १० जून जागतिक दृष्टिदान दिन (World eye donation day) म्हणून साजरा केला जातो. ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी काळजी घेत अंध व्यक्तींना नेत्रदान (Eye donation) करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातही मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयातर्फे (Mangilal Bafna Eye Hospital and Hospital jalgaon) आतापर्यंत २३७ जणांना दृष्टी देऊन डोळस केले आहे. अनेकांना विविध कारणांमुळे डोळे गमावून दृष्टिहीन व्हावे लागते, अशांना आपण मृत्यूनंतर नेत्रदानाद्वारे डोळस करू शकतो. यासाठी मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ होणे गरजेचे आहे. (world-eye-donation-day-237-people-saw-the-creation-through-eye-donation)

eye donation day
कोरोनामुळे मरणोत्तर नेत्रदानास प्रतिसाद शून्य

नेत्रदान कोण करू शकतो?

एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. जिवंत असताना डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, चष्मा वापरत असणाऱ्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. रेबीज, सिफिलिस, सांसर्गिक कावीळ, सेप्टिसेमिया, एड्‍स या रोगाने बाधित असणाऱ्यांना नेत्रदान करता येत नाही.

नेत्रदान करताना घ्या अशी काळजी

नेत्रदान करायचे इच्छापत्र लिहून दिल्यावर मृत्यूनंतर नातेवाइकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासांत मृत व्यक्तीचे डोळे नेत्रपेढीत जमा होतील, असे पाहावे. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रपेढीत दूरध्वनी करून खालील बाबीची पूर्तता करायला हवी.

eye donation day
भयंकर घटना : वीज थेट डोक्यावर पडली; दोन जण ठार !

नेत्रपेढीचे मानवतावादी कार्य

मृत व्यक्तीचे डोळे काढून घेणे ही क्रिया फक्त ३० मिनिटांची असून, डोळे काढल्यानंतर कोणतीही खूण दिसत नाही. जळगावात केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलाल बाफना नेत्रपेढी ज्या व्यक्तींना डोळ्यांची आवश्यकता आहे, त्यांना त्या डोळ्यांचे वाटप करते. ३ मार्च १९९९ ला स्थापन झालेल्या या नेत्रपेढीत आतापर्यंत ५१२ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यातील २३७ नेत्रांद्वारे अंधत्व असलेल्यांना डोळस केले आहे. उर्वरित नेत्र पुणे आणि इतर नेत्रपेढीत आवश्यकतेनुसार पाठविले आहेत.

जगाच्या एकचतुर्थांश अंध व्यक्ती भारतात

जगाच्या एकचतुर्थांश व्यक्ती भारतात दृष्टिहीन आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणाऱ्या अंध व्यक्तींची संख्या ४.६० दशलक्ष असून, बाहुलीच्या पडदारोपणाने लाखो अंधव्यक्तींना दृष्टी प्राप्त होत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून या जागतिक दृष्टिदान चळवळीत सहभागी होऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com