वादळी तडाखा..दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्‍यू; झोपडीवर पडले झाड

वादळी तडाखा..दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्‍यू; झोपडीवर पडले झाड
Storm hit
Storm hitStorm hit

जळगाव : वादळामुळे खळ्यातील (Cyclone taukae) झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू (Sister death) झाला. सदर घटना दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अंचलवाडी (ता.अमळनेर) येथे घडली आहे.

Storm hit
संतापजनक..आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; झोपलेली असताना पिशव्या पेटवून फेकल्‍या अंगावर

दक्षिण- पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळ जळगाव जिल्ह्याला धोका नसल्‍याचे सांगण्यात येत आहे. परंतु, रत्‍नागिरी, सिंधदुर्ग परिसरात धडकलेल्‍या वादळाचा परिणाम जिल्‍ह्यात देखील काहीसा जाणवत आहे. ढगाळ वातावरण आणि जोरदार वारा येत आहे. दूपारी अडीचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील जूनी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) या दोघी बहिणींचा मृत्‍यू झाला.

आई- वडील शेतात

सदरची घटना घडली त्‍यावेळी बल्‍लू बारेला व त्‍याची पत्‍नी हे नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. चिंचेचे झाड झोपडीवर कोसळल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण झोपडी दाबली जाऊन झोपडीतील सामानांचे नुकसान देखील झाले आहे.

Storm hit
‘तौत्के’चा धोका नाही..पण जळगावात पाऊस अन्‌ जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळुन पडली

ग्रामस्थांची धाव

घटना घडल्‍याचे समजताच ग्रामस्‍थांनी धाव घेतली. सरपंच भगवान पाटील, रंगराव पाटील, गोपाळ पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ व तरुण मदतीला धावून आले. झाडाखाली दबलेल्‍या दोन्ही बहिणींना बाहेर काढण्यासाठी झाड कापून मुलींचे मृतदेह व सामान बाहेर काढण्यात आले.

वडील करतात सालदारकीचे काम

ज्योती आणि रोशनी बारेला यांचे वडील बल्लू बारेला हे रणाईचे (ता. अमळनेर) गावातील रहिवासी असून ते राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक जोरात वादळ व पाऊस सुरू झाला. जोराच्या वाऱ्यात चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com